गुहागर, ता. 29 : जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेला सोहम समीर बावधनकर हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र ठरला असून त्याची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय पडवे राजापूर येथे निवड झाली आहे. Soham succeeds in Navodaya exam
शहरी विभागातून नवोदय विद्यालयासाठी निवड होणे अत्यंत कठीण समजले जाते, मात्र सोहमची जिद्द व चिकाटी तसेच शाळेचे व पालकांचेच प्रयत्न यावर त्याने हे सुयश संपादन केले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. Soham succeeds in Navodaya exam

तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. भागवत मॅडम, विस्ताराधिकारी श्री गावणकर साहेब, केंद्रप्रमुख श्री लोहकरे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, माजी मुख्याध्यापिका हिरवे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किशोर बागडे, स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ स्नेहा भागडे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता – पालक संघ, शिक्षक पालक संघ सदस्यांनी सोहम बावधनकर व त्याच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री अमोल धुमाळ सर व शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाचे हार्दिक अभिनंदन केले आहे. Soham succeeds in Navodaya exam
