गुहागर, ता. 28 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे ईद उल अहदा (ईद मिलनचा कार्यक्रम) 30 जून 2023 रोजी सायं. 6.30 ते 10 वाजता बाहरेनमधील दाना गार्डन नं. 17 येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात रहाणाऱ्या कोकणी बांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कोकण कमिटी, बाहरेनचे अध्यक्ष सर्फराज मुल्ला यांनी केले आहे. Eid Milan in Bahrain by Konkan Committee

कोकणातील, पालघर, वसई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील बहुसंख्य कोकणी बांधव बाहरेनमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त रहातात. या सर्वांना एकत्र आणण्याचे काम 2011 मध्ये स्थापन झालेल्या कोकण कमिटीतर्फे सातत्याने केले जाते. तसेच समाजातील गरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, विधवा महिलांना मदत, वैद्यकीय मदत, पूरग्रस्त्र लोकांना मदत, क्रिकेट स्पर्धा भरविणे. अशी कामे कोकण कमिटी तर्फे केली जातात. Eid Milan in Bahrain by Konkan Committee
कोकणी बांधवांनी एकत्र येवून 30 जून रोजी ईद मिलनचा आनंद साजरा करावा म्हणून कोकण कमिटीने कार्यकमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या सुरवातीला कुराण पाकची तिआवत पढण्यात येणार आहे. त्यानंतर कोकण कमिटी, बाहरेनचे अध्यक्ष सर्फराज मुल्ला हे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सन 2022 ते 2023 मध्ये दहावी बारावी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. Eid Milan in Bahrain by Konkan Committee

या ईद मिलनचा कार्यक्रमाला कोकणी बांधवांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कोकण कमिटी, बाहरेनला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष सर्फराज मुल्ला यांनी केले आहे. अशी माहिती कोकण कमिटीचे माजी सदस्य वहाब मणियार यांनी पत्रकारांना दिली. Eid Milan in Bahrain by Konkan Committee