तालुक्यातील ७९ शाळेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक सत्कार
गुहागर ता. 27 : नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे व वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्ट, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड तालुक्यातील सर्व शाळांमधील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व शाळा मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच तज्ञ मार्गदर्शन बोलवून करिअरबद्दल मार्गदर्शन केले जाते. या वर्षी उपक्रमाचे सतरावे वर्षे आहे. Career guidance ceremony concluded at Khed


नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,पुणे व वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्ट संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील ७९ शाळेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक सत्कार करण्यात आला. या वर्षी उपक्रमाचे हे सतरावे वर्षे आहे. यावेळी जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक प्रा विजय नवले यांनी “करिअरची निवड व पायाभरणी “यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम रिध्दी सिध्दि मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. Career guidance ceremony concluded at Khed
यावेळी प्रा.राजेंद्र सोनवणे, खेड आमदार श्री.दिलीपराव मोहीतेपाटील, कामगार नेते सुखदेव तात्या सोनवणे, प्रा.विनोद चौधरी, मेजर गजानन सोनवणे, तुषार वाटेकर, यशवंत घोडे, शरद थोरात, प्रा.दिलीप गोरे, शुभम सोनवणे, अनेक शाळा मुख्याध्यापक व पालक तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Career guidance ceremony concluded at Khed


कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षपूजन करुन व झाडाला पाणी घालून, आगळ्या वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संदेश देत मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. ते म्हणाले,”काव्यमंच गेली २३ वर्षे काव्यक्षेञात भरिव कार्य करत आहे. काव्यमैफल, कार्यशाळा, काव्यसहली, पुस्तक प्रकाशन, महाकाव्यसंमेलन, शालेय मुलांना कवितेची आवड निर्माण होण्यासाठी”एक तास कवितेचा, कवी तुमच्या भेटीला..!” हा उपक्रम विनामूल्य राबविला जातो. मुख्याध्यापक दरवर्षी आपल्या विद्यालयातील होतकरु मुलांना दत्तक घ्यावे.आपल्याकडे निदान एक हजार पुस्तकांची लायब्ररी असावी. भविष्यातील अनेक उपक्रमांची माहिती दिली.” Career guidance ceremony concluded at Khed
करिअर मार्गदर्शन करताना प्रा.विजय नवले म्हणाले,”आपले करिअर निवडताना आपल्या आवडीनेनुसार निवडावे. आपल्या क्षमता, मेहनत व कल पाहुन त्यात उच्चप्रतीचे यश संपादन करावे. नवनविन संशोधनाच्या विभागात काम करावे. विविध शाखांमधून आपल्या यश प्राप्त करता येते. व्यावसायाकडे वळण्याचा त्यांनी युवकांना सल्ला दिला.” Career guidance ceremony concluded at Khed


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहीते पाटील म्हणाले,”सर्व गुणंवत विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन करतो. चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे. आपण यापुढे ही उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेत आपल्याला टिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.” Career guidance ceremony concluded at Khed
दलित पॅंथरचे महाराष्टप्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे म्हणाले,” आपल्या खेडच्या भूमित पदमश्री नामदेव ढसाळ, सरन्यायधीश चंद्रचूड, क्रांतीकारक भगतसिंग, कामगार नेते मेघाची लोखंडे आणि ज्ञानेश्वरांच्या सानिध्याने आपल्या भूमीचा गौरव केला आहे.आपण कितीही मोठे झाला तरी आपले आई वडिल हे गुरु आहेत.त्यांना कधीही विसरु नका.ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे.भविष्यात अनेक स्पर्धेला तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. Career guidance ceremony concluded at Khed


यावेळी विद्यार्थी वर्गास सन्मानपञ, गोल्डमेडल तसेच मुख्याध्यापक यांना पुस्तक, गुलाबपुष्प, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. सूञसंचालन तुषार वाटेकर तर आभारप्रदर्शन प्रा.विनोद चौधरी यांनी मानले. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Career guidance ceremony concluded at Khed