• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावे येथे व्यवसायिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

by Mayuresh Patnakar
June 27, 2023
in Guhagar
114 1
0
Businessmen's get-together at Dhopave
224
SHARES
641
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री. कालिका माता जनजागृत मंडळ धोपावे मंडळातर्फे आयोजन

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हनुमान मंदिर धोपावे येथे दि. २५ जुन २०२३ रोजी दुपारी ३ वाजता गावातील व्यावसायिकांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हनुमंताला रुईची माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. Businessmen’s get-together at Dhopave

या कार्यक्रमाला श्री. राजन दळी, स्वयंरोजगार व शेती श्री.वसंतराव उदेग, गावपाटील श्री.शिवशंकर पाटील,  सरपंच श्री.आशिर्वाद पावसकर, पोलीस पाटील श्री.अमोल निमकर, उपसरपंच श्री.संदीप पवार, धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.अनिल चव्हाण, धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई सरचिटणीस श्री.अनिल भुवड आणि श्री.विलास निमकर ( साखरी त्रिक्षुल-साखरी सरपंच ) श्री.सचिन म्हसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  Businessmen’s get-together at Dhopave

यावेळी श्री. दिनेश नाटेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत श्री कालिका जनजागृती मंडळ, धोपावे सन २०११ स्थापन झाल्यापासून विविध शैक्षणिक, सामाजिक कार्यांचा आढावा सादर केला. तसेच उपस्थित मान्यवर यांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. धोपावे गावातील उपस्थित आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. धोपावे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण यांनी विशेषतः श्री.कालिका माता जनजागृती मंडळाचे कौतुक केले. धोपावे गावाला  गेले ४० वर्ष भेडसावणाऱ्या रस्ता आणि पाणी या प्रमुख विषयावर विचार मांडले. धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई सरचिटणीस श्री.अनिल भुवड यांनी श्री.कालिकामाता जनजागृती मंडळाने निमंत्रण केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच “माझ्या गावातील मंडळ अनेक उपक्रम राबवित आहे; त्याचा सार्थ अभिमान आहे”  असे आवर्जून सांगितले. राजकारण विरहीत गावाचा विकास करुयात धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई कडुन सहकार्य असेल नविन व्यवसायिकांना उत्साह निर्माण करण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहुयात. असे देखिल सांगितले. Businessmen’s get-together at Dhopave

श्री.राजन दळी यांनी गावाबद्दल असलेले व्हिजन सादर केले. गट-तटाचे राजकारण न करता गावयोजना;  जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, किंवा त्या..त्या क्षेत्रातील संबंधित मंत्र्याजवळ गावात कार्यकर्ते यांची विभागणी करुन योजना राबवण्यात याव्यात असे आर्वजुन सांगितले. निवडणुकीपुरते गावात एक दिवस राजकारण करा. बाकी सर्व दिवस विसरुन जा. सरपंच हा कुठल्याही पक्षाचा नसतो. गावातील लोकांच्या सेवेसाठी आहे. गावात सुख-सुविधा आणण्यासाठी कटीबद्ध आहे. असे धोपावे गावातील मा.सरपंच श्री.आशिर्वाद पावसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. Businessmen’s get-together at Dhopave

प्रतिकूल परिस्थितीत वेगळी वाट चोखाळुन गावात उद्योगव्यावासाय करणाऱ्या सोहम व साहिल संदीप पवार (दुग्धव्यवसाय) श्री.अनंत सिताराम डावळ (शेळी पालन) सौ.उर्मिला महेश गुरव (वडापाव) सौ.मृण्मयी व श्री.शास्वत कुडाळकर (वडापाव) सौ.अश्विनी व श्री.नरेश पवार (भाजी व्यापारी) श्री.दत्ताराम संसारे  (मच्छी व्यवसाय ) श्री.ओंकार भडसावळे (दुग्ध -उत्पादन ) श्री.अंकुश डावळ ( खुप चालुन पेप्सी विक्री) श्रीमती प्रभावती गुडेकर ग्रुप, श्रीमती ऐश्वर्या जांभारकर ग्रुप श्री.विपुल तोंडणकर ( वाहन ) श्री ‌सुहास संसारे  (वाहन ) सौ.प्रियांका शिरगावकर ग्रुप, श्रीमती भारती शिरगांवकर ग्रुप, श्री.शैलैश पालशेतकर (वाहन ) श्री.नवनाथ शिरगांवकर (वाहन ) आकर्षणी शिरगांवकर, तेजल जाधव (भजनी बुवा ) या व्यवसाय करणाऱ्यांना सन्मानिय श्री.वसंतराव उदेग यांच्या हस्ते “सन्मानपत्र” देण्यात आले. नंतर श्री संजय भोसले यांनी श्री वसंत दादा उदेग यांचा सविस्तर परिचय करून दिल्या नंतर श्री उदेग दादा यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन केले. Businessmen’s get-together at Dhopave

श्री.वसंतराव उदेक साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भौतिक सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. सजावट नको परंतु व्यवसायात स्पर्धा करता आलीच पाहीजे. आता जे उपस्थित आहेत ते नक्कीच पुढे जातील. सर्वजण होतकरू आहेत. आपली प्रवृत्ती अशी असली पाहिजे की, देण्याची तयारी असेल तर आपोआपच आपल्याकडे संपत्ती येते. धोपावे गावाची फळी चा़ंगली आहे. शिक्षणाने चांगले माणुस बना. असे आलेल्या सर्व व्यवसायिक ग्रामस्थ यांच्या जवळ संवाद साधताना सोप्या सरळ भाषेत सांगितले. त्यामुळे साहजिकच मनाचा वेध घेण्यात ते यशस्वी झाले. धोपावे गावात अजुनही रोजगार व मानसिकता तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी कळवंडे गावात धोपावे मधील व्यावसायिक व ग्रामस्थ यांनी सांगितलेली  परिस्थिती सत्य आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आवर्जून या असे आवाहन त्यांनी केले. श्री.कालिकामाता जनजागृत मंडळाचे कार्यकर्ते श्री.अजित सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानुन सामुदायिक प्रार्थना करुन मेळाव्याची सांगता करण्यात आली. Businessmen’s get-together at Dhopave

Tags: Businessmen's get-together at DhopaveGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.