श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे आयोजन
गुहागर, ता. 27 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे दि, 29 जून 2023 रोजी, आषाढी एकादशी निमित्त ‘नाट्य-अभंग रंग’ हा अभंग, भक्तीगीत व नाट्य गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात रात्री 9:30 वाजता होणार आहे. तरी या ‘नाट्य-अभंग रंग’ कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे निवेदन निबंध कानिटकर यांनी दिले आहे. Song programs on the occasion of Ashadhi Ekadashi

या मैफलीसाठी गायक म्हणून शमिका भिडे, विशारद गुरव, अभिजित भट उपस्थित रहाणार आहेत. आणि त्यांना हार्मोनियम -वरद सोहनी, तबला: केदार लिंगायत, पखवाज : पुष्कर सरपोतदार, तालवाद्य : हरेश केळकर साथ देणार आहेत. तरी या ‘नाट्य-अभंग रंग’ कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा. Song programs on the occasion of Ashadhi Ekadashi
