कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन पाटील यांची माहिती
गुहागर ता. 24 : अन्य कृषी उत्पन्ना प्रमाणेच खैराच्या लाकडाचा समावेश रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमात, नियमित करून घेतला पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा कात व्यावसायिक संघ करीत आहे. आज खऱ्या अर्थाने खैराच्या लाकडाचा समावेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमात झाला आहे. Khair wood will be counted in agriculture


या लढ्याला चालना कुणी दिली असेल पाठपुरावा कोणामुळे झाला असेल तर केवळ रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यवसायिक संघामुळे झाला आहे, असे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन उर्फ आबा पाटील यांनी सांगितले. तसेच शासनाच्या जाचक अटीमुळे पूर्वी व्यवसायिकांना खूप अडचणींना तोंड देत व्यवसाय करावा लागत होता. परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या प्रयत्नाने खैर व कात व्यवसायासाठी लाकूडतोड आणि वाहतूक परवानगी लायसन बाजार समिती मार्फत दिले जाणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमालामध्ये खैराचे लाकूड याची गणना केली जाणार असल्याचे देखील ते म्हणाले. Khair wood will be counted in agriculture
सुलोचना मंगल कार्यालय मांडकी सावर्डे येथे रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळी यांच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून गजानन पाटील बोलत होते. या मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड व्यापारी संघटना पदाधिकारी स्वामील संघटना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Khair wood will be counted in agriculture


पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या जागेतील आपल्या शेतातील खैर तोडून विक्री करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते. वनविभागाच्या, पोलिसांच्या कारवाया यांना तोंड द्यावे लागत होते. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आखत्यारीत याची वाहतूक व विक्रीची परवानगी लायसन देण्याचे अधिकार आल्यामुळे भविष्यात शेतकरी अत्यंत सन्मानाने अभिमानाने आपला व्यवसाय करू शकतो. व्यवसायासाठी लाकूडतोड आणि वाहतूक परवानगी लायसन आता आमच्या मार्फत दिले जाणार आहे. खैर लाकूड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमालामध्ये गणले जाणार असून याचा समावेश करण्यात आला आहे. Khair wood will be counted in agriculture
३ मार्च रोजी याची नोटीस प्रसिद्ध झाली. ९ मार्चला अधिसूचना झाली त्यानंतर खैर लाकूड बाजार समितीच्या नियमांमध्ये समाविष्ट करावा याबाबत कोणाच्या हरकती, म्हणणे असेल तर त्या मागविलेल्या होत्या आणि याबाबत एकही हरकत कोणी येथे नोंदवली नाही. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याचे उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचे उत्तम सहकार्य लाभले. आपल्याला अभिमान वाटेल असे अधिकारी आपल्या जिल्ह्याला डॉ. सोपान शिंदे यांच्या रूपाने मिळाले आहेत. आज खऱ्या अर्थाने त्यांचाच सन्मान सोहळा झाला असता पण ते महत्त्वाच्या कामानिमित्त पुणे येथे असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असे पाटील म्हणाले. Khair wood will be counted in agriculture


या कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रस्तावना सचिन बाईत यांनी केली. तर अध्यक्ष बाळकृष्ण जाधव यांच्या हस्ते श्री. गजानन पाटील यांना शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. बाजार समिती उपसभापती सुरेश सावंत यांनी आपल्या भाषणात कात व्यवसायिक संघाला आपले सर्वोतपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. Khair wood will be counted in agriculture


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे उपसभापती सुरेश सावंत, बाजार समिती माजी प्रशासक संदेश तोडणकर, रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ उपाध्यक्ष बबनशेठ लोकरे, कमिटी मेंबर सचिन बाईत, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पांडुरंग कदम, सचिव संतोष गुरसळे, खजिनदार दत्ताराम महाडीक, रमेश तेटांबे, उद्योजक पराग लोकरे, लक्ष्मण शिगवण, रत्नागिरी जिल्हा स्वामील संघटना अध्यक्ष दीपक परचुरे, रत्नागिरी तालुका लाकूड व्यापारी संघ अध्यक्ष शेखर घोसाळे संघर्ष तालुका लाकूड व्यापारी संघ अध्यक्ष किरण जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे, संगमेश्वर तालुका लाकूड व्यापारी संघ अध्यक्ष दादा सुर्वे, चंद्रशेखर पानिंद्रे,विशाल मालवणकर, तुषार देवळेकर, सुजित रेपाळ, विलांकन देवळेकर, कृष्णा खांबे, साखरपा विभाग लाकूड व्यापारी संघ अध्यक्ष पप्पू गांधी, विलास गुरव, हसमुख पटेल, संदेश कदम, बाबा सुर्वे, नयन सुर्वे, मानसिंग महाडिक, दत्ताराम महाडिक, मिलिंद तेतांबे, प्रशांत तेटांबे, स्वप्नील जाधव, कपिल शिर्के तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Khair wood will be counted in agriculture