जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांची माहिती
गुहागर, ता. 23 : मोठ मोठ्या घोषणा, पण कागदावर काहीच नाही. प्रचंड महागाई आणि विविध प्रश्नांसंदर्भात नाकर्तेपणाचा कळस गाठलेल्या सरकारला ३० जून रोजी सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. याच दिवशी या सरकार विरोधात गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुहागर तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आ. भास्कर जाधव करणार असून तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी व सर्वसामान्य जनतेने मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले. Protest march at Guhagar on 30th
गुहागर बाजारपेठेतील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमूख सचिन बाईत, माजी सभापती विलास वाघे, पूर्वी निमुनकर, विलास गुरव, रवींद्र आंबेकर, पूजा कारेकर, श्रावणी पेडणेकर, सिध्दी सुर्वे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, महिला आघाडी प्रमुख सारिका कनगुटकर, विनायक मुळे, राजाराम गुहागरकर, जयदेव मोरे, डी. पी. गुरव आदी उपस्थित होते. सर्वप्रथम शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. राज्यात बेकायदेशीर सरकार सत्तेवर बसले आहे. या सरकारने जनतेपुढे अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. या सरकारमुळे वाढलेली महागाई, शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय, जिल्ह्यामध्ये कमी शिक्षक आहेत आणि त्यामुळे अनेक शाळा हे बिगर शिक्षकी आहेत. राज्यात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना गुहागर तालुक्यात पुन्हा एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागून येथे उद्योगधंदे यावेत, यासाठी आ. जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तसेच ग्रामसेवक, तलाठी रिक्त पदे आहेत. यामुळे यांच्याकडे दोन तीन ग्रामपंचायत आणि तलाठी सजेचे कामे आहेत. त्यामुळे कामे खोळंबलेली आहेत. आ. भास्कर यादव यांनी गुहागर मतदार संघासाठी 50 कोटीच्या वरती कामे मंजूर केली आहेत. त्याला या सरकारने स्टे देण्याचा काम केले आहे. एकीकडे नवीन कामाला मंजूर देतो म्हणून आमची जुनी कामांचा स्टे उठवला तरी सर्वसामान्यांचे सरकार जे काही बोललं जातं ते अधोरेखित होईल. परंतु, तसं कुठे दिसत नाही. Protest march at Guhagar on 30th
विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाणून-बुजून त्रास दिला जात आहे. रेशन दुकानावर केशरी कार्ड बंद आहेत. अनेक मुद्दे निवडणूक न झाल्यामुळे रखडले आहेत. 15 वित्त आयोगाचा निधी असेल किंवा इतर जे काही निधी असतील ते पंचायत समिती जिल्हा परिषदेला येतात ते आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे आराखडे करू शकत नाही. म्हणून त्यासाठी निवडणुका देखील लवकरात लवकर व्हावेत, अशी मागणी या मोर्चाद्वारे करणार आहोत. आमचे पक्षप्रमुख आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. शासन आपल्या दारी असा एक फसवण्याचा प्रयोग सरकारने सुरू केला आहे. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले. Protest march at Guhagar on 30th