• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत सलग दुसऱ्या वर्षी आषाढ वारी

by Guhagar News
June 23, 2023
in Ratnagiri
121 1
0
Ashad Wari in Ratnagiri
237
SHARES
678
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२९ जून रोजी शक्ती मंदिर मारुती मंदिर ते भक्ती मंदिर विठ्ठल मंदिरापर्यंत

रत्नागिरी, ता. 23 : गत वर्षीच्या आषाढी एकादशीला रत्नागिरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, विठू माऊलीच्या गजरात आषाढवारी संपन्न झाली होती. यंदाही २९ जून रोजी आषाढ वारी तेव्हढ्याच जल्लोषात निघणार असून यंदा हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. या वारीच्या पोस्टरचे आज संध्याकाळी हॉटेल विवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. Ashad Wari in Ratnagiri

रत्नागिरी शहराचं ऊर्जा स्थान असलेलं मारुती मंदिरपासून निघालेली ही वारी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरातील विठू माऊलीच्या भेटीला गेली जाणार आहे. वारीची इच्छा मनात बाळगणाऱ्या हजारो जणांनी यात गतवर्षी सहभागी होत, वारीची अनुभूती घेतली होती. गतवर्षी प्रमाणेच या वर्षीही आषाढी एकादशी निमित्त दिनांक 29 जून रोजी शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशी आषाढ वारी आयोजित केली आहे. Ashad Wari in Ratnagiri

नूकतीच वारीच्या नियोजनाची बैठक झाली. सदर बैठकीत वारीच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी जनतेने उत्स्फूर्त सहभागी व्हावे आणि वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी ॲड. रुची महाजनी, केशव भट, आनंद मराठे विजयराव पेडणेकर, राजन फाळके, माधव ताटके, संतोष पावरी, राकेश नलावडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. Ashad Wari in Ratnagiri

Tags: Ashad Wari in RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.