गुहागर, ता. 23 : सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास होऊन सहकारी संस्था आर्थिक सक्षम व्हावी, म्हणूनच केंद्र सरकारने देशभरातील १३७०१ विकास संस्थांना (PACC) कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ३०० हून अधिक CSC मध्ये विविध सेवा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर केंद्रीय गृह मंत्री तथा सहकारमंत्री ना. अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. Selection of Sansare for the Common Service Center program

या प्रशिक्षण शिबिरासाठी देशभरातून एकूण १००० तर राज्यातून ३६ जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील या ३६ जणांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागरातील जानवळे विकास सोसायटीचे सचिव श्री. अंतिम मधूकर संसारे यांच्या उल्लेखनीय कामाची केंद्रसरकारने दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्यातील ३६ जणांमध्ये निवड करण्यात आली आहे. Selection of Sansare for the Common Service Center program

देशात सहकाराच्या माध्यमातून सहकारी विकास संस्थांचा विकास व्हावा, यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन विकास संस्थांना CSC मध्ये ३०० हून अधिक सेवा देण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. यामध्ये सध्या नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. या योजनांचा लाभ देशभरातील १३७०१ संस्थांना मिळणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरुपात केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम संसारे यांना हा बहुमान प्राप्त झाल्याने तालुक्यातील विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सचिव यांनी अंतिम संसारे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. Selection of Sansare for the Common Service Center program
