वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी
गुहागर, ता. 22 : गुहागर देवपाठ स्मशानभूमी येथे रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याआधी बाग व खालचापाट येथे वाळू उपसा सुरू होता. परंतु ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यामुळे तेथील वाळू उपसा बंद झाला आहे. त्यांचा मोर्चा आता देवपाठ येथे वळवला आहे. Guhagar beach sand extraction
गुहागर देवपाठ येथील व्याघ्रंबरी देवळासमोर समुद्रकिनारी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवर रात्री वाळू उपसा सुरू आहे. येथे काळोखात येऊन वाळूच्या पिशव्या भरल्या जातात. ही वाळू चार चाकी गाड्यांमधून नेण्यात येते. वरचा पाट, बाग येथे मोठ्या प्रमाणात अशाच प्रमाणे वाळू उपसा होत आहे. वाळू मोठ्या प्रमाणात काढल्याने तिथे खड्डे पडले आहेत. त्या खडयात पाणी भरत असल्याने किनारा शिल्लक राहिलेला नाही. तसेच पाण्याचा प्रवाह ही बदललेला आहे. Guhagar beach sand extraction
यामुळे येथील वाळू उपसा वेळीच थांबवला नाही. तर भरतीच्या वेळी वाळूसाठी पाडलेल्या खड्ड्यात पाणी भरले तर भविष्यात गुहागर जनतेला, पर्यटकांना फिरायला किनाराच राहणार नाही. यामुळे येथील वाळू करणार्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. Guhagar beach sand extraction