सावर्डे मांडकी येथे २३ जून रोजी
गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळी यांच्यावतीने दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वा. सावर्डे मांडकी येथील सुलोचना मंगल कार्यालय येथे खैर लाकुड व कात उत्पादक यांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Farmers meeting of Kaat Professional Union

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळीचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, कात उद्योजक सचिन उर्फ पिंट्या पाकले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सुरेश सावंत, रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघाचे उपाध्यक्ष बबन लोकरे, जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघाचे सदस्य सचिन बाईत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पांडुरंग कदम, जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघाचे सचिव संतोष गुरसळे, खजिनदार दत्ताराम महाडिक आदी उपस्थित राहणार आहेत. Farmers meeting of Kaat Professional Union

