चिपळूणातील सुभगा चितळेंची सैनिकांप्रती कृतज्ञता
चिपळूण, ता. 21 : चिपळूणमधील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी करीता रुपये एकसष्ट हजार देणगी दिली. त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. Flag day fund given on the occasion of birthday

भारतीय सैनिक सिमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहून, संपूर्ण देशाला आपला परिवार मानुन ते काम करतात. त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात, गावात, राज्यात, देशात निश्चिंतपणे रहातो. युध्दात, दहशतवाद्यांची मुकाबला करताना किंवा कर्तव्याचे ठिकाणी आलेल्या आपत्तीत अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात. या सर्व सैनिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार निवृत्त एल.आय.सी. अधिकारी सुभगा चितळे यांच्या मनात आला. आपल्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सैनिक कल्याणासाठी एकसष्ट हजाराची देणगी देण्याचे त्यांनी निश्चित केले. Flag day fund given on the occasion of birthday

सदर राशीचा धनादेश जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांचे नावे श्री उमेश सखाराम आईर, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांना सुपूर्त केला. यावेळी सेवानिवृत्त सैन्य अधिकारी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, कल्याण संघटक रत्नागिरी लक्ष्मण गवळी, वसतिगृह अधिक्षक चंद्रशेखर भोसले, चिपळूणातील सैनिक कल्याण बोर्डाच्या वसतिगृह अधिक्षिका सविता गायकवाड, फेस रिडर अक्षय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. Flag day fund given on the occasion of birthday
सुभगा चंद्रशेखर चितळे तसेच चंद्रशेखर हनुमंत चितळे यांच्या मोलाच्या योगदानासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले. Flag day fund given on the occasion of birthday
