• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे शाळेत प्रवेशोत्सव

by Mayuresh Patnakar
June 21, 2023
in Guhagar
396 4
0
Khodde school Entrance Festival
777
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांचे औक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण जागृतीसाठी फेरी, प्रथम प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण, खाऊवाटप, पाठ्यपुस्तकांचे वितरण असे कार्यक्रम प्रवेशोत्सवानिमित्त घेण्यात आले. तसेच शाळेच्या बोअरवेलचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. Khodde school Entrance Festival

Khodde school Entrance Festival

निर्मल ग्रामपंचायत खोडदे उपसरपंच व सदस्य शाळा व्यवस्थापन कमिटी खोडदे नं.१ तसेच सर्व पालक व ग्रामस्थ  यांचे उपस्थितीत जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने गावामध्ये शिक्षण जागृती फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. शिक्षण जागृती फेरी शाळेत आल्यावर इयत्ता पहिलीमध्ये प्रथमच प्रवेश घेणाऱ्या कु. आरुष शैलेश पवार, कु. मीरा संतोष गुरव, कु. लावण्या दशरथ नवरेकर, कु. मंजिरी सुजय पाटील या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फुल देवून करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक, मान्यवर यांना खाऊ वाटण्यात आला.  तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. Khodde school Entrance Festival

Khodde school Entrance Festival

निर्मल ग्रामपंचायत खोडदेने १५ व्या वित्त आयोगातून जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ बोअरवेल मंजूर केली होती. शाळा सुरु होण्यापूर्वी ग्रामपंचायतीने हे काम पूर्ण केले. शाळेच्या पहिल्या दिवशी बोअरवेलचे उद्‌घाटन आणि शाळेकडे हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बोअरवेलचे उद्घाटन उपसरपंच कुमारी पूजा गुरव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. तनुजा पवार, श्री. नाना साळवी,  शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संदेश साळवी, उपाध्यक्ष सौ. अपर्णा साळवी, शिक्षण तज्ञ विलास गुरव, मुख्याध्यापक श्री. आगिवले गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते शरद साळवी, सुरेश साळवी, विनायक गुरव, महेश साळवी उपस्थित होते. Khodde school Entrance Festival

Khodde school Entrance Festival

प्रवेशोत्सव आणि बोअरवेलच्या उद्‌घाटनाचे वेळी संतोष गुरव, सुजय पाटील, सौ. शर्वरी साळवी, सौ. मधुरा साळवी, सौ. मधुरा साळवी सौ. साक्षी सावंत, सौ. सुषमा पांचाळ, सौ. पवार, सौ. पांचाळ, सौ. कोली, सौ. रेपाळ, सौ. गुरव मॅडम, श्रीमती प्रिया पवार, श्रीमती श्रद्धा साळवी, सौ. मयुरी साळवी, सौ. वैदही चव्हाण, श्री. नितीन मोहिते आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संदेश साळवी सर आणि विलास गुरव शिक्षण तज्ञ यांनी संपूर्ण केले. श्री. विलास गुरव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. आगिवले सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. Khodde school Entrance Festival

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKhodde school Entrance FestivalLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share311SendTweet194
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.