मढाळ येथे एसके-4 हळद लागवड प्रकल्प यशस्वी करणार; सरपंच अंकिता चव्हाण
गुहागर, ता. 20 : मढाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच SK-4 या हळदीच्या वाणाचे पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी यांना धन्यवाद देत हे प्रात्यक्षिक प्रयोगशिल शेतकरी रविंद्र कारकर यशस्वी करतील, असा विश्वास सरपंच अंकिता चव्हाण यांनी व्यक्त केला. Turmeric Cultivation Project at Madhal

कृषी विभाग, जि.प.रत्नागिरी व पंचायत समिती गुहागरच्या वतीने हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत SK-4 हळद रोपे लागवडीचे प्रात्यक्षिक मढाळ येथील शेतकरी रविंद्र गणपत कारकर यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाचा शुभारंभ मढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. Turmeric Cultivation Project at Madhal
जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने यावर्षी संगमेश्वर, गुहागर, चिपळूण व खेड या चार तालुक्यात SK-4 हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा निश्चय केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार व कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी या योजनेसाठी प्रोत्साहन देवून हळद रोपे व निविष्ठांसाठी 75% अनुदानाची तरतूद केलेली आहे. गुहागर तालुक्यातील 10 शेतक-यांच्या शेतावर प्रत्येकी 10 गुठे क्षेत्रावर प्रात्यक्षिक (डेमो प्लॉट) घेण्यात येणार आहे. Turmeric Cultivation Project at Madhal

मढाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रथमच रविंद्र गणपत कारकर यांनी 10 गुंठे क्षेत्रावर SK-4 हळद रोपांची लागवड केली आहे. लागवडीसाठी सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर करण्यात आलेला आहे. पाऊस गेल्यानंतर हळद रोपांना ठिंबक सिंचन व्यवस्था करण्यासाठी जोडओळपद्धतीने लागवड केली आहे. SK-4 हळद रोपांची निर्मिती पंचायत समिती, गुहागरच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या प्रकल्पात पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. Turmeric Cultivation Project at Madhal
यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पं.स.चे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, संगमेश्वर पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी प्रणव भायनाक, कृषी सहाय्यक दत्तात्रय गिते, ग्राम पंचायत सदस्य वैष्णवी मोरे तसेच रविंद्र कारकर, ओंकारेश्वर बचत गटातील श्रद्धा कारकर, बबन कारकर, सारथकी पागडे, सुलोचना कारकर, शुभांगी कारकर इ. शेतकरी उपस्थित होते. Turmeric Cultivation Project at Madhal
