परशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत
रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडवले पाहिजे, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी पालक व शिक्षकांनी हातात हात घालून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी केले. Newcomers welcome to Agashe Vidyamandir

भारत शिक्षण मंडळाच्या आगाशे विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, शाळा समिती सदस्य सतीश दळी, अनंत आगाशे, चंद्रकांत घवाळी आणि सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. Newcomers welcome to Agashe Vidyamandir

या वेळी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी विद्यार्थी, पालकांना शाळेची माहिती दिली. तसेच सर्वांचे स्वागत केले. शाळेचे विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शाळा व भारत शिक्षण मंडळ प्रयत्न करत असल्याचे अभिमानाने सांगितले. Newcomers welcome to Agashe Vidyamandir

विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. शाळेच्या भव्य पटांगणावर त्यांची एक फेरी काढण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका व सर्व सहकारी शिक्षिकांनी नवागतांचे औक्षण करून आणि चाफ्याचे फूल देऊन स्वागत केले. शाळेच्या नाटेकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. कदम आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सुरेख गाणी शिकवली. सौ. प्रीती देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. भिंगारे यांनी आभार मानले. Newcomers welcome to Agashe Vidyamandir

