चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. देवघर मधील एका चायनीज सेंटरमध्ये चायनीज खाल्याने ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अन्न भेसळ विभागाकडे अधिक तपासासाठी नमूने पाठविले आहेत. Seven people from Deoghar food poisoning

देवघर येथील विषबाधा झालेले आदित्य अजित गुजर (वय २०), सोहम पवार (वय १६), निशांत विनायक सकपाळ (वय १६), साहिल शंकर राठोड ( वय १६), सागर संजय गुजर ( वय २४), संकेत संजय गुजर (वय २२), श्रेयस सचिन चव्हाण (वय २०) यांना गुहागर ग्रामिण रुग्णालयामध्ये शुक्रवारी रात्री ९.३० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सातही जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने ग्रामिण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. रात्री उपचारानंतर तब्बेत बरी झाल्याने ते घरी गेले. कोणालाही पुढील उपचारासाठी हलवीलेले नाही. Seven people from Deoghar food poisoning

दरम्यान या घटनेची माहीती गुहागर पोलिस निरिक्षक तुषार पाचपुते यांना कळताच त्यांनी सदर रूग्णांची भेट घेतली. प्रकृती स्थीर असल्याचे रूग्णालयामधून सांगण्यात आले. मात्र सदर रूग्णांनी गुहागर पोलिसांना तक्रार देण्यास नकार दिला. परंतु सातही जणांचा घेतलेल्या जबाबामध्ये देवघर येथीलच चायनीज सेंटरमध्ये चायनीज खाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांच्या विषबाधीत अन्नाचे नमूने घेऊन अन्ना भेसळ प्रशासन विभागाकडे अधिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. Seven people from Deoghar food poisoning
