रत्नागिरी, ता. 18 : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाजपचे कार्यकर्ते दुचाकीवर स्वार झाले. मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरवात झाली. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासमवेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. Bike rally in Ratnagiri under Modi @ 9 initiative

मारुती मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व मारुतीरायाला अभिवादन करून रॅलीला सुरवात झाली. दुचाकीला भाजपचे झेंडे फडकत होते. तर कार्यकर्त्यांनी भाजपाचे भगवे गमचे गळ्यात घातले होते. यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. Bike rally in Ratnagiri under Modi @ 9 initiative

या फेरीमध्ये तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, ओंकार फडके, शहराध्यक्ष अण्णा करमरकर, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, राजेंद्र पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, माजी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर, प्रमोद खेडेकर, दादा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, प्रवीण देसाई, शैलेश बेर्डे, राजन फाळके, विजय सालीम, संजय पाथरे, श्रीकांत मांडवकर, महिला यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. Bike rally in Ratnagiri under Modi @ 9 initiative

