शृंगारतळी ते गुहागरमधील मोडकाघर पुलाशेजारील रस्ता झाला डांबरीकरण
गुहागर, ता. 16 : गेली चार वर्षे मोडकाघर येथील रस्त्यावरून वाहनचालकांबरोबर संपूर्ण जनतेचा खडतर प्रवास सुरू होता. अशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व जमिनीचा कोर्टात वाद सुरू असूनही जमिन मालकांनी दिलेल्या सहमतीमुळे रस्ता डांबरीकरण झाला आहे. यामुळे जनता सुखावली असुन शहरातील दोन किलोमिटरपर्यंतचेही खड्डे भरावेत. अशीही मागणी शिवसेनेचे शहरपमुख निलेश मोरे, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी केली आहे. Asphalting of road near Modkaghar bridge

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी ते गुहागरमधील मोडकाघर येथील पुलाशेजारील रस्ता जमिन शासकीय की खाजगी या वादात न्यायालयीन बाब ठरला आहे. जमिन मालक सदर रस्त्याचे भूसंपादन रितसर करावे, अशी मागणी करत आहे. दरम्यान न्यायालयीन वादात मोडकाघर पुलाला लागून असलेला ४०० मिटरचा रस्ता जीवघेणा ठरला होता. धरणाच्या पाण्यातूनच एकपदरी रस्ता चढ चढून येताना पडलेल्या मोठ मोठया खड्डयांनी रस्ता निसरडा बनला होता. मे हिन्यात छोटी वाहने अनेकवेळा चढ चढू शकत नव्हती. तर दुचाकीस्वार डबलशीटवरील व्यक्तीला खाली उतरवून चढ चढत होता. परिणामी अनेक अपघातही घडले होते. अशा परिस्थितीत आपत्तकालीन परिस्थिती पहाता जमिन मालक महेंद्र आरेकर यांनी जनतेला सोयीचे व्हावे. यासाठी न्यायालयीन बाब बाजुला ठेवत आहे तो रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सहमती दिली. Asphalting of road near Modkaghar bridge

यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्री. कोणेकर, मनिषा कन्स्ट्रक्शनचे श्री. मार्कंड यांनी तातडीने रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले आहे. यामुळे येथील प्रवास सुखकारक ठरला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे हे काम कौतुकास्पद असून शहरातील दोन किलोमिटरवर पडलेले खड्डेही बुजवावेत. जेणेकरून जनतेला अधिक सोयीचे होईल अशी मागणी यावेळी केली. यावेळी शहर प्रमुख निलेश मोरे, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, राकेश साखरकर आदी उपस्थित होते. Asphalting of road near Modkaghar bridge
