• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबईतील ६ चौपाट्यांवर १२० सुरक्षा रक्षकांची नेमणूक

by Guhagar News
June 16, 2023
in Maharashtra
107 1
0
Appointment_of_120_security_guards_at_6_chowpattas_in_Mumbai

Appointment_of_120_security_guards_at_6_chowpattas_in_Mumbai

211
SHARES
602
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 16 : बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक वृद्धींगत करण्याच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. Appointment of 120 security guards at 6 chowpattas in Mumbai

मुंबईतील विविध चौपाट्यांवर बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईतील समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती केली जाते. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात आणि प्रसंगी बुडण्याच्या दुर्घटना घडतात. Appointment of 120 security guards at 6 chowpattas in Mumbai

अशा घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक वृद्धींगत करण्याच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. यानुसार मुंबईतील गिरगाव चौपटी, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा चौपाटीच्या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तसेच दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असतील. Appointment of 120 security guards at 6 chowpattas in Mumbai

मुंबईला सुमारे १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा मुख्यत्वे कुलाबा येथे सुरू होऊन गोराई आणि तेथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. नागरिक व पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटन किंवा फिरण्यासाठी मुंबईत सहा चौपाटी उपलब्ध आहेत. यापैकी गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. या सहा चौपाट्यांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत असतील. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी हे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक प्रयत्न करतील तसेच पाण्यात बुडण्याच्या घटनांपासून नागरिकांचा बचावही करतील. Appointment of 120 security guards at 6 chowpattas in Mumbai

Tags: Appointment of 120 security guards at 6 chowpattas in MumbaiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in Guhagarsecurity guardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसुरक्षा रक्षक
Share84SendTweet53
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.