शिक्षकांची 227 पदे रिक्त, उर्दु माध्यमाच्या 24 शिक्षकांची आवश्यकता
गुहागर, ता. 14 : आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरु होत असताना गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून कोणत्या शिक्षकांना या शाळांवर पाठवायचे याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 196 शाळांमधील 227 शिक्षकांची पदे रिक्त असून उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये 24 शिक्षकांची तातडीने नियुक्ती आवश्यक आहे. No teachers for schools

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गेल्यावर्षी नासा आणि इस्त्रोला भेट देण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर परीक्षा व मुलाखती घेवून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने गुहागर तालुक्यातील शाळांमधुन विज्ञान आणि गणित विषयांच्या तयारीसाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. शालांत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा, नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी गेली दोन वर्ष शिक्षक जीवतोड मेहनत घेत आहेत. मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे व्यस्त प्रमाण ज्ञानाची गंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे. No teachers for schools

आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ज्ञानोत्सवाच्या या आनंददायी प्रारंभाला मात्र शिक्षकांच्या कमतरतेची किनार आहे. गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाहीत अशी स्थिती आहे. तालुक्यात 196 शाळा आहेत. या शाळांच्या पटसंख्येनुसार 617 शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात 390 शिक्षकच उपलब्ध आहेत. 9 शाळांना मुख्याध्यापक नाहीत. 168 पदवीधर शिक्षक आवश्यक असताना केवळ 70 पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. 98 पदे रिक्त आहेत. उपशिक्षकांची 120 पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमांच्या शिक्षकांना मोठ्या पटसंख्येच्या शाळेत कामगिरीवर पाठवून अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करता येतो. परंतु गुहागर तालुक्यातील उर्दु माध्यमाच्या 10 शाळांपैकी 6 शाळा उच्च प्राथमिक वर्गांच्या आहेत. येथे 37 शिक्षकांचे काम केवळ 13 शिक्षक करत आहेत. या शाळांना उर्दु माध्यमांचे शिक्षक कसे उपलब्ध करायचे याची चिंता शिक्षण विभाग करत आहे. No teachers for schools
शाळेचा पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक जातील याची व्यवस्था आम्ही केली आहे. शुन्य शिक्षकी शाळा आणि अन्यत्र असलेली शिक्षकांची कमतरता याविषयाची माहिती जि.प.शिक्षण विभागाला दिलेली आहे. शिक्षक देण्यासाठी तेथील अधिकारी कार्यवाही करत आहेत. No teachers for schools – लिना भागवत, गटशिक्षणाधिकारी, गुहागर
