ग्राहक आणि कर्मचारी हैराण, तीन दिवसांच्या समस्येवर उत्तर नाही
गुहागर, ता. 13 : बँक ऑफ इंडियाच्या गुहागर शाखेत शुक्रवार 9 जूनपासून इंटरनेट यंत्रणा ठप्प झाली आहे. ही परिस्थिती मंगळवार 13 जूनपर्यंत बदललेली नाही. या परिस्थितीमुळे बँकेतील कर्मचारी आणि ग्राहक मात्र हैराण झाले आहेत. Bank of India operations halted due to internet collapse
बँक ऑफ इंडिया ही गुहागर तालुक्यातील पहिली राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे या बँकेचे खातेदारही जास्त आहेत. आज शहरात युनियन बँक, आयडीबीआय, कॅनरा आदी राष्ट्रीयकृत बँक आल्या आहेत. तरीही अनेक व्यापारी, नोकरदार, व्यावसायिकांनी बँक ऑफ इंडियावरच भरवसा दाखवला होता. मात्र गेल्या काही महिन्यात सातत्याने इंटरनेट ठप्प होत असल्याने बँकेचा ग्राहक वैतागला आहे. Bank of India operations halted due to internet collapse


जुन महिन्यात तर हद्दच झाली. सलग 3 कार्यालयीन कामकाजांच्या दिवसांत बँक ऑफ इंडियामधील इंटरनेट यंत्रणा ठप्प झाली. शुक्रवारी 9 जूनला अधुनमधुन येणाऱ्या इंटरनेटमुळे काही व्यवहार कर्मचाऱ्यांनी केले. परंतु सलगता नसल्याने ग्राहकांना एका व्यवहारासाठी तीन ते चार तास बँकेत तिष्ठत बसावे लागत होते. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर बॅकएण्डचे कामाचा निपटारा करण्यासाठी बँक कर्मचारी रात्री 9 वाजेपर्यंत बँकेत थांबले होते. सोमवारी बँकेत नेहमीच गर्दी असते. 12 जूनलाही बँकेतील नेटवर्क यंत्रणा कोलमडली होती. मंगळवार, ता. 13 जूनलाही तीच परिस्थिती होती. त्यामुळे ग्राहकांबरोबरच येथील कर्मचारीही हैराण झाले होते. महत्त्वाचे व्यवहार फोनवरुन माहिती कळवून शृंगारतळी व अंजनवेल शाखेतून केले जात होते. Bank of India operations halted due to internet collapse


याबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, क्षेत्रीय कार्यालय रत्नागिरी येथे आम्ही इंटरनेट ठप्प होत असल्याचे सांगितले आहे. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक देण्यासही येथील अधिकाऱ्यांनी नकार दिला. अखेर अन्य मार्गाने क्षेत्रीय कार्यांलय रत्नागिरी येथील आयटी विभागात काम करणारे राहुल कुलकर्णी यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांना फोन केल्यावर सुरवातीलाच तुम्हाला माझा फोन कसा मिळाला असा उलट प्रश्र्न विचारुन कुलकर्णी यांनी फोन बंद केला. पुन्हा फोन लावल्यावर आम्ही बीएसएनएलकडे तक्रार केली आहे. आता बीएसएनएलकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे. असे उत्तर राहुल कुलकर्णी यांनी दिले. Bank of India operations halted due to internet collapse