• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या एसटी कर्मचाऱ्याने वाढवली पाँवरट्रीलरची पाँवर

by Mayuresh Patnakar
June 13, 2023
in Guhagar
182 2
0
Mahadik increased the power of the power trailer

दीपक महाडिकच्या अनोखेपणाचे कौतुक

358
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांगरणी झाली सोपी, वेळ व श्रमाची बचत, दीपक महाडिकच्या अनोखेपणाचे कौतुक

गुहागर, ता. 13 : इच्छाशक्ती दांडगी असेल तर व्यक्ती अशक्य ते शक्य करु शकते. गुहागर एसटी आगाराच्या कर्मचाऱ्याने अशी अनोखी शक्कल लढवून ऐन शेतीच्या हंगामात पाँवरट्रीलरने नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गुहागर तेलीवाडी येथील दीपक अनंत महाडिक असे त्याचे नाव असून गुहागर आगारामध्ये तो लिपिक टंकलेखक म्हणून सेवेत आहे. Mahadik increased the power of the power trailer

 सध्या तंत्रज्ञान युगात शेतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. यांत्रिकीकरण आल्याने शेतीची कामेही करणे सोपी झाली आहेत. लाकडाच्या फाळाचा नांगर जाऊन आता पाँवरट्रीलर शेतकऱ्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना बहुसंख्य शेतकरी या यंत्राचा वापर करताना दिसून येत आहेत. गुहागर तेलीवाडी येथील राहणारा दीपक महाडिक याला लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने कायम शेतीशी त्याची नाळ जोडली गेली आहे. शाळा, महाविद्यालयात असतानाही व एसटीमध्ये नोकरी लागल्यानंतरही कधीही शेतीपासून तो दूर झालेला नाही. कारण शेती ही काळाची गरज असल्याचे त्याचे ठाम मत आहे. आजही तो नोकरीतून वेळ काढून शेती करत आहे. बैलांचा नांगर तयार करणे व नांगरणीला वेळ लागत असल्याने नोकरी सांभाळून शेती करणे त्याला शक्य होत नव्हते. म्हणून यांत्रिक शेतीकडे वळून एक पाँवरट्रीलर खरेदी केले. Mahadik increased the power of the power trailer

 पाँवरट्रीलरने नांगरणी करताना जमिनीला समांतरपणा येत नाही. त्यामुळे शेतात एकाच ठिकाणी पाणी साचणे, चिखलणीला अडथळे येणे असे प्रकार दरवर्षी घडतात हे त्याचे लक्षात आले. यावर काय उपाययोजना करता येईल याचे त्याने नीट विचार करुन पाँवरट्रीलचे निरीक्षण केले. त्याने एक लोखंडी ब्रँकेट तयार करुन त्या ब्रँकेटच्या लाकडी टोकाला नटबोल्ड फीट करुन ते पाँवरट्रीलरच्या नांगराला अडकवून जमिनीला समांतरता कशी आणता येईल या प्रयोग करुन पाहिला. त्याची ही अनोखी कल्पना सत्यात उतरल्याने आपल्याला यामध्ये नक्की यश येईल असे ओळखून त्याने आपला वेल्डर असलेला मित्र बोलावून पाहिजे तसा ब्रेकेट तयार करुन घेतला आणि पेरणी करुन शेत नांगरणीला सुरुवात केली. या प्रयोगामुळे पेरणीनंतर ढीपळ फोडण्यासाठी वेळ व श्रम लागत होते ते यामुळे कमी झाले आहेत. तसेच चिखलणीच्या वेळी शेतात पाणी समांतर राहून चिखल करणे सोपे जाणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. Mahadik increased the power of the power trailer

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahadik increased the power of the power trailerMarathi NewsNews in Guhagarpower trailerUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share143SendTweet90
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.