कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई, ता. 10 : आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत. काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. Major weather changes due to hurricanes

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी वाढलेल्या तापमानामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहेत. नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, सातारा, कोल्हापूर, पुण्याचे तापमान चाळीशीच्या आत गेले. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. तर पुढील 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा चार जिल्ह्यांना फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. Major weather changes due to hurricanes

चक्रीवादळाच्या प्रभामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. परंतु हा पाऊस मान्सूनचा पाऊस नसेल. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. साधरण 12 जूनच्या आसपास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईल. वादळ क्षीण होऊपर्यंत मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी असेल. Major weather changes due to hurricanes
