डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल रु. 2 लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. Grants will be given to minority schools

या योजनेच्या अटी व शर्ती
अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू) किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यता प्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. महा नगरपालिका व जिल्हापरिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीपत्याखाली चालविण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. यापुर्वी या योजनेंतर्गत ५ वेळा अनुदान प्राप्त केलेल्या शाळा / संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार नाहीत. एकाच इमारतीत / आवारात एकाच संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वेगवेगळया शाळा/महाविदयालये/ हे दिवसभरातील स्वतंत्र वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या पाळीत/सत्रात भरत असतील आणि त्यांचे DIES CODE वेगवेगळे असतील अशा परिस्थितीत त्या इमारतीसाठी/ आवारासाठी या DIES CODE पैकी फक्त् एकाच DIES CODE साठी अनुदान मंजूर करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालविणा-या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयं- अर्थसहाय्यीत शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाहीत. Grants will be given to minority schools

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत देण्यात आलेला आहे. त्यानुसार पात्र मदरासांनी आपले प्रस्ताव दिनांक ३० जून, २०२३ पूर्वी विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले. Grants will be given to minority schools
