गुहागर ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
गुहागर, ता. 10 : खालचापाट येथील दोन स्पीड बेकर वर लवकरात लवकर रिफ्लेक्टर लावण्यात यावे अशी मागणी गुहागर वासियांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. Reflectors should be placed on speed bakers

खालचापाट येथे आरेकर यांचे घरासमोर व असगोली रोडला विखारे यांचे घरासमोर स्पीड बेकर असून त्याच्यावर पांढरे पट्टे अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहन चालकांना हे स्पीड बेकर दिसण्यात येत नाहीत. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. स्पीड बेकर दिसत नसल्यामुळे अचानक समोर स्पीड ब्रेकर आल्यामुळे मोठ्या गाड्या जोरात आपटणे अथवा लहान गाड्या मोटरसायकल स्वार अनेक वेळा पडताना दिसत आहेत. तरी या स्पीड बेकर वर लवकरात लवकर पांढरे पट्टे अथवा रिफ्लेक्टर लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Reflectors should be placed on speed bakers

खालचा पाट मराठी शाळेजवळ सुद्धा अशाच प्रकारचा स्पीड बेकर होता. परंतु त्या स्पीडबेकरवर दोन दिवसांपूर्वी स्पीड बेकरची उंची कमी करून तेथे रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत. यामुळे तिथे स्पीड बेकर आता दिसण्यात येत आहे. तेथील स्पीड बेकर वर रिफ्लेक्टर लावल्यावर आता याही दोन स्पीड बेकर वर रिफ्लेक्टर लावतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु ते न लावल्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिफ्लेक्टर लावण्याची मागणी केली आहे. Reflectors should be placed on speed bakers
