• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश सुरु

by Manoj Bavdhankar
June 9, 2023
in Ratnagiri
49 0
0
Admission to Trisem Training Center begins
96
SHARES
274
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जुलै  ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता व्यवसायांचे प्रशिक्षण

रत्नागिरी, ता. 09 : ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक/युवतीना तसेच दारिद्रय रेषेवरील युवक / युवतींच्या  तांत्रिक शिक्षणाकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी या कार्यालयाच्या अधिपत्याखाली चालविण्यात येणारे ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर. आय.टी.आय. आवार, नाचणे रोड, रत्नागिरी येथे जुलै  ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता खालील व्यवसायांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. तरी इच्छूक युवक / युवतीनी याचा लाभ घ्यावा. Admission to Trisem Training Center begins

या प्रशिक्षणामध्ये मोटर अॅण्ड आर्मेचर रिवायंडींग, ऑफिस फर्निचर मेकींग अॅण्ड रिपेअरींग, हाऊस पाईप फिटींग या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास व मोटर अॅण्ड सव्हिसिंग ऑफ रेडिओ अॅण्ड एलसीडी, एलईडी टीव्ही या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता एसएससी प्रवेशित आहे.  प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने मुदतीचा असून संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ, मुंबई यांच्यामार्फत परिक्षा घेण्यात येईल व परीक्षेत उत्तीर्ण होणा-या प्रशिक्षणार्थ्यांना मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. Admission to Trisem Training Center begins

दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीना दरमहा नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल.  दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन सवलत मिळणार नाही. शासकीय नियमानुसार असणारे दरमहा शैक्षणिक शुल्क (फी) त्यांना भरावी लागेल.  रत्नागिरी बाहेरील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये राहण्यास वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय अथवा तालुका पंचायत समिती कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी फोन नं. (०२३५२- २२२५३०) अथवा ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, आय. टी. आय. आवार, नाचणे रोड, रत्नागिरी मोबा. नं. ९८८१७६२५२६ / ९४२११८८९५७ या ठिकाणी ३० जून २०२३ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरी यांनी केले आहे. Admission to Trisem Training Center begins

Tags: Admission to Trisem Training Center beginsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVocational trainingगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजव्यवसायांचे प्रशिक्षण
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.