• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी

by Manoj Bavdhankar
June 9, 2023
in Maharashtra, Ratnagiri
61 1
0
Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route
120
SHARES
344
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार आहेत. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

यासंदर्भात कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरू गाडी शुक्रवारी, ९, १६ आणि २३ जून रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शन – अहमदाबाद गाडी दर शनिवारी, १०, १७ आणि २४ जून रोजी रात्री ९ वाजून १० सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

ही गाडी महाराष्ट्रात वसई, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी येथे, तर गोव्यात थिवी, करमाळी, मडगाव येथे थांबणार घेणार आहे. या विशेष गाडीला २२ एलएचबी डबे असतील. त्यात दोन टायर एसी – ३, इकॉनॉमी थ्री टायर एसी – १२, स्लीपर – ३, जनरल – २, जनरेटर कार – १ आणि एसएलआर १ यांचा समावेश आहे. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWeekly special train on Ahmedabad-Mangaluru routeअहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.