रत्नागिरी, ता. 09 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याफळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे. Start of horticulture development campaign

राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. Start of horticulture development campaign

या फलोत्पादन विकास अभियानामध्ये फुले लागवड मोहिमेतंर्गत कट प्लॉवर्स, कंदवर्गीय व सुटी फुले, मसाला पिक लागवडीतंर्गत बिया व कंद वर्गीय मसाला पिके व बहुवर्षीय मसाला पिके तसेच विदेश फळ पीक लागवड अंतर्गत ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी व अवॅकॅडो त्याचबरोबर जुन्या फळ बागांचे पुनरुज्जीवन अशा सारख्या विविध कृषी बाबींशी निगडीत असलेल्या योजनांवर प्रतिहेक्टर अनुदान दिले जाते. Start of horticulture development campaign योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Start of horticulture development campaign
