• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी सैनिकांना ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी बाबत आवाहन

by Manoj Bavdhankar
June 9, 2023
in Ratnagiri
118 1
0
Online Registration of Ex-Serviceman Identity Card
231
SHARES
661
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ माजी सैनिकांचे अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी शासनाने संगणकीकृत ऑनलाईन पध्दतीचा वापर केला आहे. त्यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेत स्थळाचा वापर करून संबंधितानी स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. सदर रजिस्ट्रेशनसाठी फक्त माजी सैनिकास  १०० रुपये एवढी रक्कम फी स्वरूपात ऑनलाईन पध्दतीने आकारण्यात येईल. Online Registration of Ex-Serviceman Identity Card

रजिस्ट्रेशन करणेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, संपूर्ण पानासहीत डिश्चार्ज बुक, पी.पी.ओ, पेन्शन पासबुकाचे पहिले पान, इ.सी. एच एस. कार्ड, दोन फोटो आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावीत.  तरी सर्व संबंधितानी नवीन ओळखपत्र बनविणेसाठी उपरोक्त संकेतस्थळावर आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. Online Registration of Ex-Serviceman Identity Card

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOnline RegistrationOnline Registration of Ex-Serviceman Identity CardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.