माजी नगराध्यक्षांचा पाठपुरावा, भरावाची माती काढण्यास सुरवात
गुहागर, ता. 09 : शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्यानंतर अवघ्या चार दिवसांत वरवेली व पालशेत गावांनाही अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा फटका बसला. याची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी धरणाची पहाणी केली. धरणावर पुल बांधताना टाकलेला भराव अद्याप ठेकेदाराने काढला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे बेंडल यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ठेकेदाराने पोकलेन पाठवून पुलाखालील भरावाची माती काढण्यास सुरवात केली आहे. Water got blocked due to soil under Modka Aagar bridge

रविवारी (4 जून) गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी धरणाजवळची विहीर आटली. तातडीने नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी खोल चर खणून धरणातील पाणी विहीरपर्यंत आणले. त्यापाठपोठ वरवेली, पालशेत या दोन्ही ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरींमधील पाणी पातळी कमी झाली. याची माहिती एप्रिल 2023 अखेर मुदत संपलेले गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना मिळाली. त्यांनी तातडीने मोडकाआगर धरणाला भेट दिली. त्यावेळी धरणाच्या उत्तरेला असलेला पाणीसाठा पुलाखालील भरावामुळे दक्षिणकडे वहात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. Water got blocked due to soil under Modka Aagar bridge

2022 मध्ये ठेकेदाराने नवीन पुलाचे काम करण्यासाठी धरणात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला होता. हा भराव काढुन टाकावा, असे तत्कालीन नगराध्यक्ष राजेश बेंडल, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी ठेकेदाराला लेखी कळवले होते. मात्र ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. जून 2022 मध्ये पाऊस पडूनही पाणी वहात नाही असे लक्षात आल्यावर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी अक्षरश: पावसात उभे राहून ठेकेदाराकडून भरावातील काही माती काढुन पाणी वहाते केले. यंदाच्या मे महिन्यात धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर सर्व भराव काढुन टाकण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले. परिणामी धरणातील पाण्याचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन झाले. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा असूनही दक्षिणेकडील भागातील पाण्याची पातळी कमी झाली. त्याचा फटका गुहागर शहरासह वरवेली व पालशेत ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनांना बसला. Water got blocked due to soil under Modka Aagar bridge

माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी ही बाब 7 जूनला प्रत्यक्ष घटनास्थळावरुन दूरध्वनीद्वारे महामार्ग व लघुपाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना कळवली. तातडीने ठेकेदाराने एक पोकलेन भरावाची माती काढण्यासाठी पाठवून दिला. 7 जूनला सायंकाळपासून धरणाच्या उत्तर भागातील माती काढण्याचे काम सुरु झाले आहे. दोन दिवसांत दोन्ही बाजुची माती काढली जाईल. अशी अपेक्षा आहे. त्यानंतर दक्षिणेकडील धरणभागातील पाण्याची पातळी वाढेल व पाणी पुरवठा योजनांच्या विहीरींमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होईल. अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी गुहागर न्यूजजवळ बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत वरवेलीचे सरपंच नारायण आगरे व पालशेत ग्रामपंचायत सदस्य पंकज बीर्जे उपस्थित होते. Water got blocked due to soil under Modka Aagar bridge
