दोन दिवसातच पावसाची शक्यता
गुहागर, ता. 08 : गुहागर समुद्र किनाऱ्या लगतच असलेल्या खोडद्याला पाणी आले आहे. खोडद्याला पाणी आले की, लवकरच पाऊस पडतो. असे ग्रामस्थांचे अनुभव आहेत यामुळे आता लवकरच पाऊस पडेल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. Chance of rain in two days


गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरुची झाड त्यालगत देवपाठ स्मशानभूमी ते बाजारपेठ असा खोडदा आहे. या खोडद्याला पावसातच पाणी असते. गेले कित्येक महिने या खोडद्याला पाणीच नाही. परंतु समुद्राला उधाण आले व हा खोडदा संपूर्णपणे पाण्याने भरला. यामुळे ग्रामस्थांमध्ये पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी असे खोडद्याला पाणी आल्यावर पाऊस येतो असे गेले कित्येक वर्षाचा ग्रामस्थांचा अनुभव आहे. कालच खोडद्याला थोड्या प्रमाणात पाणी होतं परंतु आजच्या भरतीत मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे पाऊस हमखास पडेलच अशी आशा ग्रामस्थांना वाटत आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी पेरा करून ठेवलेला आहे. तर गेले दोन महिने उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. यामुळे सगळेजण आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत. Chance of rain in two days

