संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि.प.आदर्श केंद्रशाळा शीर नं १ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली (Primary Health Center Abaloli) तर्फे तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र शीर व ग्रामपंचायत शीर यांच्या संयुक्त विद्यमाने व लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण (Life Care Hospital Chiplun) यांच्या सहकार्याने घेण्यात आले होते. या शिबिराला शीर येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Health checkup camp held at Sheer
या आरोग्य शिबिरात लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण यांच्यावतीने संपूर्ण आरोग्य तपासणीसह कॅन्सर तपासणी, ECG तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ १०० ग्रामस्थांनी घेतला. या शिबिरासाठी लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण च्या वतीने डॉ.पुष्कर कुलकर्णी कॅन्सर तज्ञ, डॉ.रोहित केंबूळकर सर्जन(MS), श्री.अभिजित सुर्वे व त्यांचे सहकारी यांनी तपासणी केली. तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र शीर चे वतीने CHO श्री.समर्थ अनाप, श्री.महेंद्र गाडेकर, श्री.अक्षय गडगे, श्री.संजय अम्बुसे, श्री.मन्सूर पठाण तसेच आरोग्य कर्मचारी श्री.मदन जानवळकर, श्री.सुरेश आमटे, श्री.सौरभ पांगत, वाहन चालक श्री.महेंद्र मोरे, आशा सेविका सौ.अनुराधा साळवी, सौ.मानसी टक्के, सौ.श्रद्धा टक्के, मदतनीस सौ.सिद्धी ठोंबरे तसेच अंगणवाडी सेविका यांचे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांना औषध वाटपही करण्यात आले. Health checkup camp held at Sheer
या कार्यक्रमासाठी माजी पं.स.उपसभापती व सदस्य श्री.सिताराम ठोंबरे, ग्रा.पं.शीर चे सरपंच श्री.विजय धोपट, उपसरपंच श्री.अमित साळवी, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक श्री.मच्छिंद्र देवकाते, ग्रा.पं. कर्मचारी सतीष पवार, महेश पवार व सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण शिर्के, श्री.मिलिंद टक्के, श्री.हेमंत गुरव, गावकर श्री. शांताराम ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.गणपत ठोंबरे, श्री. शंकर मोरे,श्री. मंगेश मोरे उपस्थित होते. सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले. प्रास्ताविक व समारोप पाणलोट विभाग ग्रामपंचायत शीर चे सचिव श्री.मंगेश मते यांनी केले. Health checkup camp held at Sheer