• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक

by Mayuresh Patnakar
June 6, 2023
in Guhagar
259 2
0
पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक
508
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. विनय नातू , लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही

गुहागर, ता. 06 : पक्षाने संधी दिल्यास मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. असे प्रतिपादन करतानाच रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नसल्याचे उत्तर रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विनय नातू यांनी सांगितले. Press conference on behalf of BJP in Guhagar

केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरु झालेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी भाजपने गुहागरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी डॉ. विनय नातू यांना रायगड लोकसभेची निवडणुक भाजपकडून कोण लढवणार अशी विचारणा केली. त्यावेळी डॉ. नातू म्हणाले की, सध्या राजकीय वर्तुळात रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवार नाही अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा का चालली आहे , कोण करत आहे याच्या खोलात शिरण्याची गरज नाही. मात्र जे चर्चा करताना त्यांनी लक्षात घ्यावे की, भाजपकडे लोकसभा निवडणुकीसाठी पेण विधानसभेचे विद्यमान आमदार  रवींद्र पाटील, गुहागरतून माजी आमदार म्हणून मी स्वतः, पेणेचे माजी आमदार धैर्यशील पाटील तर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे असे चार सक्षम उमेदवार आहेत. त्याच्यामुळे बाकी कुणाला जर वाटत असेल की, भाजपकडे उमेदवारच नाही तर त्यात काही तथ्य नाही. पक्ष विचारपूर्वक उमेदवार देतो. ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मी चारवेळा आमदार होतो. प्रदेश स्तरावर संघटनात्मक काम करताना काही वर्ष रायगड जिल्ह्यातही काम केले आहे. त्यामुळे पक्षाने लोकसभेसाठी विचारणा केल्यास मी खासदारकीची संधी सोडणार नाही, असे सुतोवाच डॉ. नातू यांनी केले. Press conference on behalf of BJP in Guhagar

2024 च्या विधानसभेमध्ये गुहागरची जागा शिवसेना व भाजप युतीत भाजपला मिळेल हे जवळपास नक्की झाले आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यादृष्टीने भाजप कामाला लागला आहे.  ही जागा भाजपला मिळाली तर येथील उमेदवार डॉ. विनय नातूच असतील असे मानले जात होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत लोकसभेची संधी मिळाल्यास इच्छुक असल्याचे सांगून डॉ. विनय नातूंनी एक वेगळाच धक्का दिला आहे. Press conference on behalf of BJP in Guhagar

त्यांच्या या विधानामुळे लोकसभा नातू लढवणार असतील तर विधानसभेची जागा भाजप कोणाला देणार.  नव्या दमाचा स्थानिक चेहरा भाजप इथे शोधणार  की आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देण्याची क्षमता असलेला अन्य ठिकाणचा उमेदवार इथे येणार. किंवा लोकसभा भाजपला आणि विधानसभा शिवसेनेला असे गणित राहील. अशा वेगवेगळ्या चर्चा भाजपच्या गटात सुरु झाल्या आहेत. Press conference on behalf of BJP in Guhagar

Tags: BJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यालोकल न्युज
Share203SendTweet127
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.