गुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. Balasore train accident
ओडिशातील बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकल्याची माहीती आहे. हा अपघात इतका भयानक होता की रेल्वेमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काही लोक अक्षरशः बाहेर फेकले गेले. Balasore train accident

एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहीतीनुसार, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्याचीही माहीती त्यांनी दिली आहे. यावेळी बचाव कार्यात 200 रुग्णवाहीका, 50 बस, 2 हेलिकॉप्टर, 45 मोबाईल हेल्थ युनिट, 1 हजार 200 कर्मचारी तैनात होते. Balasore train accident

रेल्वेमंत्री काय म्हणतात
या रेल्वे अपघाताबद्दल बोलताना रेल्वेमंत्री अश्र्विनी वैष्णव म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हे घडल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्याला जबाबदार कोण याची माहिती देखील समोर आली आहे. तरीही लगेचच त्यावर बोलणे उचित होणार नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यांचा तपास अहवाल लवकरच मिळले. सध्या आमचे लक्ष दुर्घटनेमुळे नादुरुस्त झालेले रेल्वे ट्रक लवकरात लवकर दुरुस्त करणे, सिग्नल यंत्रणा पुर्ववत करणे आणि रेल्वे वहातूक पुन्हा पुर्वपदावर येणे हे आहे. Balasore train accident
