सुर्वेंच्या पत्राची घेतली दखल, सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती
गुहागर, ता. 04 : मासू आवरे असोरे भातगाव रस्ता खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून करावीत. असे आदेश सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उपअभियंता श्रीमती निकम यांनी ठेकेदारांना केल्या आहेत. यावेळी या रस्त्यांशी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थही उपस्थित होते. Officials inspected the Aware Asore roads

गुहागर तालुक्यातील मासू आवरे असोरे भातगाव राईपुल या प्रमुख जिल्हा मार्गावरती खड्डे भरण्याचे काम चालू होते. या कामाचा दर्जा निकृष्ट असून, डिसेंबर 2022 मध्ये काम करण्याचे आदेश निघाले असता मे 2023 मध्ये हे काम सुरु केले आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. तोपर्यंत हा रस्ता खड्डेविरहीत ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र कामच निकृष्ट दर्जाचे असेल तर पावसाळ्यात रस्ता टिकणार नाही. खड्डे भरण्यासाठी 45 लाख रुपये खर्च करताना किमान संबंधित ग्रामपंचायतींना विश्र्वासात घेवून कामाची निश्चिती करायला हवी होती. या गोष्टी लक्षात घेतल्या तर या कामात पाणी मुरत आहे. त्यामुळे आपण कार्यवाही करावी. असे पत्र भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठवले होते. Officials inspected the Aware Asore roads

या पत्राची तातडीने दखल घेत चिपळुणचे कार्यकारी अभियंता रामशे यांनी गुहागर उपविभागाच्या उप अभियंता श्रीमती निकम यांना प्रत्यक्ष स्थळी जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्रीमती निकम सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. भाजप तालुकाध्यक्षांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसुन आले. त्यामुळे उपस्थित सरपंच व प्रमुख ग्रामस्थांनी उपअभियंता श्रीमती निकम व ठेकेदारा यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर दोन्ही ठेकेदारांनी पाऊस पडण्यापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे उत्तम काम करुन भरुन घ्यावेत. हे काम करताना स्थानिक सरपंच व ग्रामस्थांना विश्र्वासात घ्यावे. अशा सूचना उपअभियंता निकम यांनी ठेकेदारांना केल्या. Officials inspected the Aware Asore roads
यावेळी आवरेचे सरपंच प्रकाश काताळकर, आंबेरेचे सरपंच रवींद्र अवेरे, कोळवलीचे सरपंच संतोष सावरकर, भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर, पाचेरी सडा उपसरपंच संतोष आंब्रे, यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य विजय भुवड, यशवंत शितप, विशाल गोताड, काशिनाथ घाणेकर, रामचंद्र गुरव, महेश घाणेकर, प्रसन्न सुर्वे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Officials inspected the Aware Asore roads
