१० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल
मुंबई, ता. 04 : मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत बदलण्यात आली आहे. कोकणात यादरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. Konkan Railway timing changes due to Monsoon


नवीन वेळापत्रकनुसार, मंगळुरू सेंट्रल – मुंबई एलटीटी मत्सयगंधा एक्स्प्रेस (१२६२०) आता मंगळुरूहून १२.४५ वाजता निघेल. पूर्वी ही वेळ दुपारी 2.20 ची असायची. तर याच्या सोबत ट्रेन (१२६१९) मंगळुरु सेंट्रलला सकाळी ७.४० ऐवजी १०.१० वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी-मंगळुरु जंक्शन सुपरफास्ट एक्स्प्रेस येथे दुपारी १.०५ च्या ऐवजी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक 12134 येथून 4.35 वाजता सुटेल, जी आतापर्यंत दुपारी 2 वाजता सुटत होती. Konkan Railway timing changes due to Monsoon


तसेच 06602 मंगळुरु सेंट्रल – मडगाव डेली एक्स्प्रेस पहाटे 5.30 वाजता सुटेल आणि आता मडगावला दुपारी 1.10 ऐवजी 1.10 वाजता पोहोचेल. 06601 मडगावहून दुपारी 1.50 वाजता सुटेल आणि मंगळुरु सेंट्रलला रात्री 9.05 ऐवजी 9.40 वाजता पोहोचेल. 16346 तिरुवनंतपुरम – मुंबई एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस मंगळुरुला रात्री 9.35 वाजता पोहोचेल. 16345 LTT सकाळी 11.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.45 वाजता मंगळुरूला पोहोचेल. दरम्यान, रेल्वेने पावसाळ्याच्या वेळापत्रकाच्या अधिसूचनेपूर्वी तिकीट बुक केलेल्या मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या आगाऊ वेळेची माहिती करण्यास सांगितले आहे. Konkan Railway timing changes due to Monsoon