प्रभाकर आरेकर, अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा
गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे माझे प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी काम करताना मिळालेला अनुभव, प्रशिक्षण मोलाचे ठरले. जीवनात स्थिरस्थावर होऊ शकलो. सहकाराचे महत्त्व लक्षात आल्यामुळे श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेची स्थापना आणि यशस्वी वाटचाल करु शकलो. असे मनोगत प्रभाकर आरेकर यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते. Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar
श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचा 75 वा. वाढदिवस बहादुरशेख नाका, चिपळूण येथे उत्साहात संपन्न झाला. या वाढदिवसाचे आयोजन प्रभाकर आरेकर यांचे कुटुंबिय व समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी यांच्या आग्रहामुळे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar

कार्यक्रमामध्ये आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, लोटिस्माचे कार्यवाह प्रकाश देशपांडे, रिगल शैक्षणिक संस्थेचे चेअरमन संजय शिर्के, सौ. दुर्वा सुर्वे, चिखलीतील ग्रामस्थ चांदोरकर, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, ज्युदो कराटे जिल्हा असोसिएशनचे निलेश गोयथळे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, राजापूर अर्बनचे शाखाधिकारी दुर्गेश बीर्जे, सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहील आरेकर, प्रभाकर आरेकर यांच्या सुनबाई सौ. रागिणी आरेकर, माजी नगरसेविका, सौ. आदिती देशपांडे, गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन चिले आदींनी मनोगतातून प्रभाकर आरेकर यांना शुभेच्छा दिल्या. Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रभाकर आरेकर म्हणाले की, गेल्या 75 वर्षातील प्रवासाच जे काही यश मिळवले त्याचे प्रथम श्रेय आई वडिल, भावंडे यांना जाते. आर्थिक स्थिती समाधानकारक नसतानाही शिक्षण घेतले. 1971 मध्ये आमच्या परिवारातील पहिला पदवीधर झालो. चुलते कै. भाई आरेकर आणि बंधु आरेकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा बँकेत नोकरी मिळाली. पत्नी स्मिताचे कुटुंबासाठी फार मोठे योगदान आहे. आजही २ मुले, सुना, जावई, नातवंडे असे पुर्ण कुटुंब एकत्र आहे. हे मला परमेश्र्वराने दिलेले वरदान आहे. समर्थ भंडारी प्रगतीमध्ये संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक व संस्थेच्या कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar

या कार्यक्रमाला चिपळूण अर्बन बँकेचे संचालक सतिश खेडेकर, सौ. राधिका पाथरे, सुनील खेडेकर, निलेश भुरण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन गांगण, व्यवस्थापकीय संचालक अजय चव्हाण, गजानन लोकरे, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सचिन कदम, उद्योजग श्रीराम खरे, राजु भागवत, दत्त एजन्सीचे वसंत उदेग आदी मान्यवर उपस्थित होते. Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar
