• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यंदा चार तालुक्यात SK-4 हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प

by Manoj Bavdhankar
June 3, 2023
in Guhagar
65 1
0
SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks
127
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एस.के.- 4 चे प्रणेने सचिन कारेकरांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सचिन कारेकर यांनी एस. के – 4 ही हळदीची जात विकसीत केल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आले. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. असे  सांगून हळद लागवडीच्या नाविन्यपुर्ण उपक्रम 2023 मध्ये सहभागी झालेल्या चारही शेतक-यांनी हळदीचा हा प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन पं. स. गुहागरचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले. SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या सहकार्याने पंचायत समिती गुहागरच्या सभागृहात आयोजित हळद लागवडपुर्व प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संगमेश्वर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, प्रभारी जिल्हा शेती अधिकारी अमोल पाटील, कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, सुनिल गावडे, प्रणव भायनाक, जयवंत पारशे, सर्जेराव कांबळे, एम.व्ही. कुर्रे, बी.बी. पाटील आदी उपस्थित होते. SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्तीकिरण पुजार यांच्या प्रेरणेने व सुचनेनुसार यावर्षी कृषी विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने गुहागरसह चिपळूण, खेड व संगमेश्वर तालुक्यात हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत एस.के.- 4 हळद रोपे लागवडीचे प्रात्याक्षिक घेण्याची योजना करण्यात आली. या प्रकल्पात चार तालुक्यातील 40 शेतक-यांचा समावेश आहे. या चारही पंचायत समिती कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्रत्येकी 10 गुंठे क्षेत्रावर एस.के.4 या हळदीच्या वाणाची प्रात्यक्षिक स्तरावर रोपांपासून लागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पात हळद रोपे व अनुषांगिक निविष्ठांसाठी 75% टक्के मर्यादित अनुदान देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 5 लाख रूपयाची तरतूद केली आहे. SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सहाययक गट विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी पुष्पहार अर्पन करून या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले. प्रशिक्षक कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी SK-4 हळदीच्या सचिन कारेकर यांच्यासह केलेला 20 -22 वर्षाच्या प्रवासाबाबतचे विश्लेषन करून हळद रोपे तयार करण्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्राच्या आधारे विविध यशस्वी प्रयोग शेतक-यांनी केल्याचे उदाहरण पटवून सांगितले. हळद रोपे लागवडीसाठी जागेची निवड, सेंद्रीय व रासायनिक खताचा वापर, लागवडीचे अंतर, किड रोग, भर घालणेपासून तर हळद पिकाच्या विविध अवस्थेत घ्यावयाची काळजी, पाऊस गेल्यानंतर द्यावयाच्या पाण्याच्या पाळ्यापासून तर विक्री व्यवस्थेबाबतचे सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

यावेळी सह.गट विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनीही हळद लागवडीमध्ये कृषी विस्तार अधिकारी पौनीकर यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगाबद्दल गौरोदगार काढले. तर बी.बी. पाटील यांनीही हळद लागवडीबाबतचे आपले अनुभव मांडले. विजय माळींसह इतर शेतक-यांनीही आपले प्रश्न, शंका उपस्थित केल्यानंतर त्याचे समाधनकारक निरसनही यावेळी करण्यात आले. सर्व शेतक-यांचे कष्ट, मेहनत व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी करू या, असा विचार प्रशिक्षण वर्गात मांडून सांगता करण्यात आली. गुहागर सह खेड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यातील शेतक-यांसह कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांनीही या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला. प्रास्ताविक कृषी अधिकारी आर. के.धायगुडे यांनी केले. आभार कृषी विस्तार अधिकारी बी.बी.पाटील यांनी मानले. SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSK-4SK-4 Turmeric Innovation ProjectSK-4 Turmeric Innovation Project in 4 TaluksUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.