• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबतर्फे दि. 4 रोजी सायकल फेरी

by Guhagar News
June 2, 2023
in Ratnagiri
187 1
0
Cycle tour by Ratnagiri Cyclist Club
366
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 2 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत रविवारी दि. 4 रोजी सायकल फेरीचे आयोजन केले आहे. मारुती मंदिर येथून फेरीला सुरवात होऊन मांडवी समुद्रकिनारी सांगता होणार आहे. या फेरीत जास्तीत जास्त रत्नागिरीकर, मुले, महिला सायकलस्वारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. Cycle tour by Ratnagiri Cyclist Club

दरवर्षी सायकल दिन ३ जून रोजी साजरा केला जातो. यानिमित्त १०० हून अधिक सायकलिस्ट सदस्य असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी सकाळी ७ वाजता मारुती मंदिर ते मांडवी किनारा या मार्गावर फेरी काढण्याचे नियोजन केले आहे. सायकल फेरी मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदर रोड आणि मांडवीपर्यंत नेण्यात येईल. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन यशस्वी करणाऱ्या सायकलिस्ट क्लबची जिल्ह्यात ख्याती झाली आहे. तसेच वर्षभराच्या कालावधीत सुमारे पंधरा उपक्रम, कार्यक्रम राबवले आहेत. Cycle tour by Ratnagiri Cyclist Club

सायकल फेरीच्या सांगता कार्यक्रमात सहभागी सायकलप्रेमींसाठी सायकलविषयी माहिती देण्यात येणार आहे. तंत्रशुद्घ सायकल चालवण्याची पद्धत सायकलप्रेमींसाठी क्लबतर्फे काही सरप्राइजेस देखील असणार आहेत. प्रत्येक सदस्याने महिन्याला किमान ३०० किमी आणि आठवड्याला ७५ किमी सायकलिंग करणे ही रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे आगळीवेगळे शुल्क आहे. सायकलिंगला प्रोत्साहन देणे आणि सायकलिंग वाढवणे हाच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा हेतू आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी या फेरीत सायकल आणि पाण्याची बाटली घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने आत्तापर्यंत विविध उपक्रम आयोजित केले आहेत. क्लबच्या जवळपास १० हून अधिक सदस्यांनी बीआरएमसारख्या कस लावणाऱ्या स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. Cycle tour by Ratnagiri Cyclist Club

जास्तीत जास्त सायकलप्रेमीनी जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डबल एसआर अमित कवितके : 99705 57055, एसआर डॉक्टर नितीन सनगर 96898 66099, दर्शन जाधव 9970398242, महेश सावंत (बॉबी) 7744085581 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. Cycle tour by Ratnagiri Cyclist Club

Tags: Cycle tourCycle tour by Ratnagiri Cyclist ClubCyclist ClubGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share146SendTweet92
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.