रत्नागिरी, ता. 01 : शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट दिली. Students gave industrial gift to sea fans

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे अलिकडेच लोकार्पण झाले आहे. यावेळी कौशल्य विकास केंद्रातील फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस असोसिएट, हाऊस किपिंग सुपरवायझर या बॅच मधील ६० मुलांनी सहभाग घेतला होता. Students gave industrial gift to sea fans
या वेळी रिसेप्शन, फ्रंट ऑफिसचे कामकाज कसे चालते. याबद्दल सिनियर मॅनेजर अभिषेक शिंदे, रिसेप्शन स्टाफ अनिकेत पवार, युवराज मालवीया आणि रेस्टॉरंट कॅप्टन ऐश्वर्या वाघाटे यांनी फ्रॅट अॅंड बॅक सर्व्हिसबद्दल सर्व महिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपाला हॉटेलचे पार्टनर सुहास ठाकूरदेसाई यांनी रत्नागिरीतील मुलांना रत्नागिरीतच रोजगाराची संधी कशी आहे, याविषयी मार्गदर्शन केले. हॉटेल व्यवसाविषयी सविस्तर माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. तसेच कौशल्य विकास केंद्राचे प्रशासक महेश बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या हॉटेल सी फॅन्स भेटीमुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आणि हॉटेल व्यवस्थापनाचे आभार मानले. Students gave industrial gift to sea fans

यावेळी सर्व विद्यार्थी, हॉटेलमधील कर्मचारी, हॉटेल सी फॅन्सचे पार्टनर सुहास ठाकूदेसाई, कौशल्य विकास केंद्राचे व्यवस्थापक/प्लेसमेंट मॅनेजर महेश बेडेकर, शिक्षक अमेय मुळ्ये, ऋषिकेश मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते. Students gave industrial gift to sea fans
