गुहागर, ता. 31 : मुंबई विद्यापीठाचे गुहागर तालुक्यातील एकमेव मान्यताप्राप्त (माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख असलेले गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे – ढेरे – भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosale College) येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आधुनिक जगाकडे वळताना आज प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. KDB College admission process starts

हीच काळाची गरज ओळखून खरे-ढेरे भोसले महाविद्यालयाने माहिती तंत्रज्ञान विभागाला अधिक चालना दिली आहे. या विभागात विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच आपल्या विद्यालयातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पदावर काम करता यावे. यासाठी नामांकित कंपन्यांना आमंत्रित केले आहे. KDB College admission process starts
कोरोना महामारीच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा १००% क्षमतेने महविद्यालये चालू झाली आहेत. खरे ढेरे भोसले महाविद्यालयात आधुनिक जगातील महत्वाचा घटक माहिती तंत्रज्ञान ( IT ) शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया चालु झाली असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे या महाविद्यालयाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती घडवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्रा. पद्मनाभ सरपोतदार आणि सर्वच कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि तेथील जीवनशैली यांचा अभ्यास करून आपल्या सहकार्यांना वेळोवेळी योग्य मार्गदशन हे प्राचार्य पद्मनाभ सरपोतदार करताना दिसतात. KDB College admission process starts

कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या पारंपरिक शाखा आणि माहिती तंत्रज्ञान ( IT ) व्यावसायिक शाखा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी तसेच कॅम्पस इंटरव्हूय विविध प्रकारची प्रशिक्षणे, करीयर गाईडन्सची मार्गदर्शनपर शिबीर, NSS कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन महाविद्यालयामार्फत वेळो वेळी केले जाते. तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्मनाभ सरपोतदार व गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. महेशजी भोसले यांनी केली आहे. KDB College admission process starts
