मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
गुहागर, ता. 31 : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. More than one and a half lakh jobs recruitment

दिल्लीतील प्रगती मैदान येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आदी उपस्थित होते. येत्या 2027 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांनी परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले. विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. More than one and a half lakh jobs recruitment

4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील आघाडीवरील औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचे त्यांनी नमूद केले. More than one and a half lakh jobs recruitment
