• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावेतील ग्रामस्थांचा शिवसेना पक्षाला पाठींबा

by Manoj Bavdhankar
May 31, 2023
in Guhagar
170 2
0
Villagers of Dhopave support Shiv Sena party
335
SHARES
956
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मांडली पाण्याची कैफियत; जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री दिला भरघोष निधी

गुहागर ता. 31 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे, असे चित्र पहावयास मिळते. या पार्श्वभुमीवर  धोपीवे ग्रामस्थांनी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत पाण्याची कैफित मांडली व रस्त्याच्या कामावरील बंदी उठविण्याची मागणी करत  एकमताने पालकमंत्री सामंत साहेब व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा ठराव करत आश्वासन दिले. Villagers of Dhopave support Shiv Sena party

धोपावे गाव विकासापासुन अनेकवर्षे मागे गेला होता. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करु शकतात. असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पाठींबा दर्शविला आहे. यावेळी विविध कामांची मागणी तसेच प्रामुख्याने पश्चिमेच्या किनारपट्टीच्या बाजुने  संरक्षक भिंत बांधणे व रस्ता तयार करणे इत्यादी  विकास कामांची मागणी केली. या पाठींब्याबाबत मत व्यक्त करतांना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी त्यांचा विश्वास सार्थक विकासकामे लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातुन पुर्ण करु असे आश्वासन दिले. कामाची चिंता करु नका आम्ही विकासकामांसाठीच प्रयत्नशील आहोत असे सांगितले. Villagers of Dhopave support Shiv Sena party

Villagers of Dhopave support Shiv Sena party

यावेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, सचिव श्री संतोष आग्रे, उपतालुकाप्रमुख राजेश धामणस्कर, उपविभागप्रमुख नरेश पवार  व उमेश किल्लेकर सह नवनियुक्त शाखाप्रमुख श्री रोहीदास जाधव, उपशाखाप्रमुख व भिकाजी संसारे उपस्थित होते. Villagers of Dhopave support Shiv Sena party

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillagers of Dhopave support Shiv Sena partyगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share134SendTweet84
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.