बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशने केला पुरस्कार जाहीर
गुहागर, ता. 31 : कोकणातील सुप्रसिद्ध मे खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. शाळीग्राम खातू यांचा बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन यांच्यावतीने दिनांक 1 जून रोजी सांगली येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मसाले उद्योगात केलेल्या नावलौकिकाची दखल घेऊन या पुरस्काराबद्दल देण्यात येणार आहे. याबाबत श्री. खातू यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे. State Level Lifetime Achievement Award to Khatu

हा कार्यक्रम सांगली येथे दि. 1 जून रोजी दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे. श्री. शाळीग्राम खातू यांनी वडिलांच्या पिठाच्या गिरणीत मसाले बनवून विकतानाच उद्योगाचे तंत्र आणि मंत्र शिकत मसाले उद्योगाचे स्वप्न पाहिले. दुकानदारांनी मार्केटिंग शिकवले. पहिली तीन वर्षे व्यवसायातून नफा होत नव्हता. त्यातूनच उत्पादन बनवण्यासाठी आवश्यक दर्जेदार कच्चा माल कसा खरेदी करायचा, याचे गणित उमगले. उद्योगवाढीसाठी आवश्यक कर्ज उभे करण्यातून बँकिंगचा अभ्यास झाला. कारखान्यातील अपघाताने संघर्षातून जिद्दीने उभे राहण्याचा धडा दिला. अशाप्रकारे चिकाटी, अथक परिश्रम, सचोटीचा व्यवहार या सर्वांतून गुहागरमध्ये शाळीग्राम खातूंनी खातू मसाले उद्योग उभा केला. State Level Lifetime Achievement Award to Khatu

90 च्या दशकात या उद्योगाल सोनेरी दिवस आले. जिल्हा उद्योग केंद्र, बिजनेस एक्सप्रेससह चार राष्ट्रीय पुरस्काराने खातू मसाले उद्योगाचा सन्मान झाला. आज खातू मसाले उद्योगाने कोकणसह मुंबईत पाय रोवले आहेत. ॲमेझॉनसारख्या ई-कंपनीत स्थान मिळवले आहे. परदेशस्थ कोकणवासीयांच्या पसंतीस उतरला आहे. व्यावसायिक यश मिळवतानाच सैनिकांच्या कल्याणासाठी, वृद्धांच्या सेवेसाठी, कॅन्सरवरील संशोधनासाठी दरवर्षी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील खातू मसाले उद्योग करत आहे. खातू मसाले उद्योग समूहाने कोकणचे नावलौकिक निर्माण करतानाच संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चवदार मसाल्यांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. खातू मसाले उद्योग समूहाने मसाले क्षेत्रात केलेल्या घोडदौडीबद्दल बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात श्री. शाळीग्राम खातू यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. State Level Lifetime Achievement Award to Khatu
