स्पर्धेत टिकण्यासाठी सभासद व ग्राहकांना देण्यात येणारी सेवा महत्त्वाची; श्री. आरेकर
गुहागर, ता. 30 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे असंख्य सभासद उपस्थित होते. Shri Samarth Bhandari Credit Institution’s meeting concluded

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुरुवातीला उपस्थित सभासदांचे स्वागत करून कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेचे कामकाज करण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीचे कौतुक करून संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सभासद श्री. टेरवकर यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेचच घेऊन नवा आदर्श निर्माण केला. तसेच भागभांडवल पोटी गुंतवणूक करण्याचा सभासदांच्या आर्थिक हिताचा विचार केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेने सादर केलेल्या अहवालावर उपस्थित सभासदांनी आपले मत व्यक्त करून सक्रिय सहभाग नोंदविला. Shri Samarth Bhandari Credit Institution’s meeting concluded

यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीची माहिती सविस्तर सादर केली. तसेच संस्थेने केलेल्या सर्व निकष पूर्तेतेची माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीमध्ये सहकारी संचालक, कर्मचारी वर्ग याचबरोबर संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे कामकाज पारदर्शक असून सभासदांनी केलेल्या चांगल्या सूचना स्वागतार्ह असतील. तसेच सभासदांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सहकार क्षेत्रामध्ये सद्या प्रचंड स्पर्धा असून स्पर्धेत ठीकून राहण्यासाठी सभासद व ग्राहक यांना देण्यात येणारी सेवा महत्त्वाची आहे. तसेच विश्वासार्हता देखील महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. शेवटी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करून संस्थेचे सभासदांचा १४ टक्के लाभांश जाहीर केला. सभासदांनी संस्थेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. Shri Samarth Bhandari Credit Institution’s meeting concluded

या सभेला संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक अरुण पाटील, दिलीप मयेकर, पराग आरेकर, उदय वेल्हाळ, संचालिका प्रज्ञा नरवणकर, स्मिता आरेकर, श्रीम. पल्लवी भाटकर व संस्थेचे सर्व कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. शेवटी संस्थेचे सचिव संदीप रहाटे यांनी सर्वांचे आभार मानले. Shri Samarth Bhandari Credit Institution’s meeting concluded

