शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये ; हवामानतज्ञांची सूचना
मुंबई, ता. 27 : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अद्ययावत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी जाहीर केला. महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य भारतातही सरासरी पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यातही राज्याच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. ‘शेतकऱ्यांनी एखाद्या दिवसाच्या पावसाच्या हजेरीने पेरणी करण्याची घाई करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. Less than average rainfall is likely this year
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्याच्या बहुतांश आणि विदर्भाच्या काही भागामध्ये तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनच्या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस असू शकतो. कोकण विभागात सरासरी इतका पाऊस पडेल तर उत्तर कोकणात तो काही भागात सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मध्य भारतातही काही ठिकाणी कमी पावसाचीच शक्यता वर्तवली जात आहे. त्याची संभाव्यता ५५ टक्के असल्याचेही सांगण्यात आले. सांगली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. सांगली वगळता इतर जिल्ह्यांना यंदाच्या पावसात असा दिलासा मिळण्याची शक्यता सध्याच्या पूर्वानुमानानुसार कमी आहे. Less than average rainfall is likely this year
सह्याद्रीच्या पूर्वेकडे, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची संभाव्यता ३५ टक्के आहे. जूनमध्ये कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भाचा काही भाग येथे जूनच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पावसाची उपस्थिती जूनच्या पहिल्या आठवड्यात जाणवण्याची शक्यता असली तरी मान्सूनचा पाऊस कमी असू शकेल. कोकणासह मुंबईतही जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याचा वापरही जपून करणे दीर्घकाळासाठी फायद्याचे ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. येत्या मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण व उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता दिसते, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. Less than average rainfall is likely this year
मान्सूनच्या पावसाची १९७१ ते २०२० या काळातील राष्ट्रीय सरासरी ८७० मिलिमीटर आहे. वायव्य भारतात यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी (दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी) असेल; तर ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात हंगामी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण (सरासरीच्या ९६ ते १०६ टक्के) राहील’, असे आयएमडीच्या नुमेरिकल वेदर प्रेडिक्शन (एनडब्ल्यूपी) विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी शुक्रवारी सांगितले. ‘मान्सून कोअर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिशा ते राजस्थानपर्यंतच्या मध्य भारतातील खरिपाच्या क्षेत्रात या वर्षी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे,’ असेही डॉ. पै म्हणाले. Less than average rainfall is likely this year