उत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी वस्त्यांना धोका निर्माण झाला असून नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नसल्याचा ग्रामसभेत ठराव करुन ५ जूनला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. Movement of Varveli villagers on 5th June
वरवेली येथील काळा दगड उत्खननामुळे गावातील ९० घरांचे अतोनात नुकसान झाले असून पावसाळ्या अगोदर या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी करण्यात आली आहे. उत्खननात मोठ्या प्रमाणात सुरुंग लावल्याने येथील स्थानिकांच्या घरांना, मंदिर व इतर बांधकामे यांना तडे जाणे, विहिरी व बोअरवेलचे पाणी कमी होणे, ध्वनी प्रदूषण, दगड वाहतूक धुळीमुळे आंबा-काजू व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्याबाबत व आंदोलन करण्याबाबत एकमुखी ठराव करण्यात आला. Movement of Varveli villagers on 5th June

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी संबंधीत यंत्रणेकडून आंदोलनासारख्या मार्गाचा अवलंब करू नये असे ग्रा. पं. ला कळविण्यात आले होते. त्या पत्रानुसार संबंधित यंत्रणेकडून कोणती व कशा पद्धतीने कार्यवाही केली. Movement of Varveli villagers on 5th June
याबाबतचा अहवाल ग्रामपंचायतला अद्याप सादर केलेला नाही. सदर अहवाल मिळावा, नुकसानग्रस्त घरे व इतर बांधकामे यांचे पंचनामे महसूल खात्याकडून करूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच तडे गेलेल्या घरांना धोका निर्माण झालेला असून पावसाळ्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना सदर काळा दगड उत्खननाचे काम पुन्हा सुरू झालेले असून येथील स्थानिकांचा व ग्रामपंचायतचा सदर उत्खनन करण्यास तीव्र विरोध असून सदर उत्खनन बंद न झाल्यास दि. ५ जून रोजी येथील ग्रामस्थ तहसील कार्यालय गुहागर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. Movement of Varveli villagers on 5th June
