गुहागर, ता. 25 : दि. २ जून रोजी श्री छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार तीनशे पन्नास वर्षे होत आहेत. उभ्या महाराष्ट्राला शौर्याची प्रेरणा देणारा.. अस्मितेचा हुंकार प्रकट करणारा परममंगल दिवस… लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात उत्साहात आणि पवित्र भावनेने साजरा होणार आहे. मंगळवारी सायंकाळी लोटिस्मात नियोजनाची बैठक झाली. Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun
या निमित्ताने सनई-चौघड्यांचा निनाद घुमणार आहे. शिवरायांच्या पालखी मिरवणुकीत पारंपारिक वेषात असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय रायगड किल्ल्यासह विविध नद्यांचे पाणी आणून शिवरायांच्या मूर्तीला जलाभिषेक केला जाणार आहे. या दिवशी नगारिकांनी घरावर गुढी उभी करावी, असे आवाहन लोटिस्माच्यावतीने करण्यात आले आहे. या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचं निमंत्रण चिपळूण नगरवासियांना तत्कालीन परंपरेस अनुसरून शहरातील प्रमुख चौकाचौकात दवंडी पीटवून देण्यात येणार आहे. Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun
प्रातःकाळी सहा वाजता महाराजांना परिसरातील पवित्र नद्या आणि सरोवरातील जलाने मंगल स्नान घातले जाईल. स्नानानंतर महाराज पालखीतून ग्रामदैवत कालभैरव आणि जगदिश्वर (गौतमेश्वर) दर्शनाला जातील. पालखी समोर तत्कालीन मंगल वाद्ये, मर्दानी खेळ, घोडेस्वार, भगवा ध्वज, राजदंड, राजमुद्रा, अष्टप्रधान मंडळ, सरदार मावळे असा शिवशाही लवाजमा असेल .. मार्गावर केशराचे सडे घालून आणि घरांवर गुढ्या तोरणे बांधून श्री महाराजांचे स्वागत करण्यात येईल. श्री महाराज परत शामियान्यात आल्यानंतर श्री महाराजांना पुरोहित समंत्रक अभिषेक करतील. दरबारात चारण आणि भाट महाराजांची स्तुती स्तोत्र गातील. समोर नृत्य गायन आणि शाहीर पोवाडे गातील. श्री महाराजांच्यावतीने ग्रामदैवत, रामेश्वर, विंध्यवासिनी, करंजेश्वरी, कृष्णेश्वर, परशुराम मंदिरांना मानाची वस्त्रे आणि श्रीफल दिले जातील. पुरोहितांना दक्षिणा आणि वस्त्रं देऊन सन्मानित करण्यात येईल. सायंकाळी महाराजांच्या दरबारात नागरिक बंधूना पानसुपारी भगिनीना हळदीकुंकू होईल. विशेष म्हणजे या पवित्र सोहोळ्यात आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे पारंपरिक वेष परिधान करून यायचे आहे. महाराजांच्या राज्याभिषेक ज्या उत्साहात संपन्न झाला, तसाच सर्वांनी एकत्र येऊन संपन्न करुया, असे आवाहन लोटिस्माचे मार्गदर्शनक प्रकाश देशपांडे यांनी केले. Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun

अत्यंत पारंपारिक पध्दतीने हा सोहोळा संपन्न होणार आहे. दिवसभर पोवाडे, गायन आदी कार्यक्रम होतील. सतिष कुंटे यांचे गायन होईल, तर कथ्थक नृत्यांगणा स्कंधा चितळे यांचे नृत्य होईल. सायंकाळी पान-सुपारीचा कार्यक्रम होईल. सनई, चौघडे वाजतील, तुतार दणाणेल. या सोहोळ्याल चिपळूणवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun
नियोजनाच्या बैठकीला प्रकाश देशपांडे, समीर शेट्ये, विनायक ओक, डॉ. प्रशांत पटवर्धन, अदिती देशापांडे, मनिषा दामले, स्कंधा चितळे, अरुण इंगवले, संतोष केतकर, योगेश बांडागळे, श्री. शरद तांबे, श्री. कदम, साईनाथ कपडेकर, मंगेश बापट, प्राध्यापक शैलेश कुळे, पराग ओक, अभिजित देशमाने, श्रीराम दांडेकर, श्री. प्रकाश घायाळकर, मंदार आवले, मार्तंड माजलेकर, सुनिल कुलकर्णी, सुनील ( दादा ) खेडेकर आदी उपस्थित होते. Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun
