• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजापूर अर्बन को-ऑप बँकेच्या शृंगारतळी शाखेचा शुभारंभ

by Ganesh Dhanawade
May 25, 2023
in Guhagar
93 1
0
Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali
183
SHARES
522
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजापूर अर्बन को-ऑप बँक सर्वसामान्यांची; उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर

गुहागर, ता. 25 : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून राजापूर अर्बन को-ऑप बँकेकडे पाहीले जाते. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आपण शृंगारतळी शाखा सुरू करत आहोत, यासाठी आपला पाठींबा व साथ हवी आहे, असे प्रतिपादन राजापूर अर्बन को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी केले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे राजापूर अर्बन को- ऑप बँकेच्या १२ व्या शाखेचा उदघाटन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

पहिल्या दिवशी १ कोटीचीठेवी व १०० खातेदार तयार करत बँकेने गुहागर तालुक्यात दमदार पाऊल ठेवले आहे. शृंगारतळी शाखेच्या शुभारंभ निमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसाद मोहरकर म्हणाले की, कोकणात सहकार रूजण्यास उशीर झाला असला तरी आता तो खूप वाढतो आहे. विश्वासाहार्ता, पारदर्शकता आणि प्रामाणीकपणा जपलेली व ग्राहकांच्या अडीअडचणीच्या वेळेस सहकाराचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य करणारी अशी आपली राजापूर अर्बन को-ऑप बँक आहे. एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सूपंत या उंक्तीप्रमाणे सर्वांच्या पाठीशी उभी राहणारी बँक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकीक प्राप्त केला आहे. अशी ही आपली सर्वांची बँक शृंगारतळी येथे पाऊल ठेवत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक गरजा पूर्ण करताना अभिमान होत आहे. सर्वसामान्य ग्राहक बँकेकडे येतो आणि हक्काने आपली आर्थिक पुंजी बँकेकडे देतो किंवा बँकेंकडून आर्थिक सहकार्य घेऊन आपली स्वप्न पूर्ण करतो. बँकेने सुरूवातीपासून अत्याधुनिकरणाची कास धरलेली आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा ही सरकारी आणि बँकांच्या तोडीला सेवा देण्याचा प्रामाणीक प्रयत्न जोपासला आहे. यापुढे बँक प्रगतीची नवनवीन शिखरे पार करेल. यासाठी आपली साथ, पाठींबा हवा आहे आणि तो मिळेल असा विश्वास शेवटी व्यक्त केला. शृंगारतळी येथील समर्थ भवन, पहिला मजला, पोस्ट ऑफिसजवळ, बाजारपेठ शृंगारतळी येथे ही बँकेची नवी शाखा सुरू करण्यात आली आहे. Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सुरू झालेली ही शाखा बँकेची बारावी शाखा आहे, तर रत्नागिरी जिल्हयातील आठवी शाखा आहे. राजापूर, साखरीनाटे, पाचल, लांजा, रत्नागिरी, देवरूख, जानशीपठार या सात शाखा जिल्ह्यात कार्यरत असून आता शृंगारतळी ही आठवी शाखा रत्नागिरी जिल्हयात सुरू झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हयात नव्याने सुरू झालेल्या तळेरे शाखेसह वैभववाडी, कुडाळ व पडेल अशा चार शाखा कार्यरत आहेत. तर शाखा तेथे एटीएम या धोरणाप्रमाणे शृंगारतळी शाखेच्या शुभारंभ प्रसंगी तेथील एटीएमचाही शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेचे हे 14 वे एटीएम असणार आहे. Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, शाखाधिकारी आरिफ कर्णेकर आदी उपस्थित होते. Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Rajapur Urban Branch at ShringartaliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.