गुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे. ही विहिर महावितरणचे स्विच यार्ड जवळ असून, या विहिरीत मुबलक पाणी आहे. Demand of Guhagar villagers to the administration

गुहागर तांबडवाडी येथील ही विहिर खचली असून विहिरीचा बांधही ढासळलेला आहे. ज्यावेळी पाण्याचे स्त्रोत कमी होतो. त्या वेळेला जांगळवाडी, तांबडवाडी, असगोली येथील नागरिक या विहिरीतील पाणी पिण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करतात. परंतु आता ग्रामपंचायत नगरपंचायतचे पाणी असल्यामुळे या विहिरीचा वापर कमी झालेला आहे. तरीही मे महिन्यात कमी पाणी असल्यास या विहिरीचा अद्यापही वापर केला जातो. या विहिरीचा बांध कोसळल्यामुळे भितीदायक झाले आहे. कारण उर्वरित बांध कोसळून विहीर बुजण्याची भीती स्थानिकांना आहे. Demand of Guhagar villagers to the administration

या विहिरीच्या कठड्यावरून बघितलं तर आजही आठ ते दहा फुटावरच पाणी दिसते. पूर्वी पाणी आटले तर विहिरीत उतरून पाण्याचे हंडे भरून काढत असल्याची आठवण येथील युवक सांगतात. चाकरमानी आजही गावात आल्यावर या विहिरीत पाणी बघायला आवर्जून जातात. सध्या पाण्याचे स्तोत्र कमी होत असून पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने या विहिरीची देखभाल दुरुस्ती करून ही विहीर सुस्थितीत ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. Demand of Guhagar villagers to the administration
